Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Irrigation : विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी रब्बीसाठी मिळणार

Team Agrowon

Nanded News : शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी हंगाम सन २०२३-२४ मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर ७, ७ (अ) वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. ७ वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर ७,७,(अ) चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात १५ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात १५ नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. यासाठी कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत.

पिकाचे मागणी क्षेत्र २० आर च्या पटीत असावे, कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील, पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे.

रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठरावीक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरित करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT