Agriculture Irrigation : रब्बी हंगामात सिंचनासाठी पूर्ण पाळ्या मिळणार

Rabi Season : यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी धरणांमधून पाच पाळ्या पाणी देणे शक्य होणार आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी धरणांमधून पाच पाळ्या पाणी देणे शक्य होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मागणीचे अर्ज सादर करावेत, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांत ८२३ दलघमी (८० टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. साधारणपणे दिवाळीच्या आसपास किंवा नंतर रब्बी हंगामास सुरुवात होणार आहे.

गहू व हरभरा ही या हंगामातील मुख्य पिके असून दोन्ही पिकांना पाण्याची गरज आहे. आगामी रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख १८ हजार ५८३ हेक्टरमध्ये पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केली आहे.

सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत त्याचे प्रमाण ११५ टक्के आहे. यातील सर्वाधिक क्षेत्र हरभरा पिकाने १ लाख ५७ हजार तर, ५३ हजार ३७७ हेक्टर क्षेत्र गव्हाने व्यापले जाणार आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर्षी पावसाळ्यात सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष झालेल्या पावसाच्या प्रमाणात तूट असली तरी धरणांमध्ये मात्र मुबलक जलसाठा झाला आहे. सर्वाधिक सिंचन लाभक्षेत्र असलेल्या अप्पर वर्धा धरणात सद्यःस्थितीत ५६४ दलघमी (१०० टक्के) जलसाठा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Scheme : ‘कृषी सिंचन योजने’अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे

तर सात मध्यम प्रकल्पांपैकी रब्बी हंगामाचे प्रमुख क्षेत्र असलेल्या शहानूरमध्ये ४४ दलघमी (९६ टक्के), चंद्रभागामध्ये ४१.२५ दलघमी (९९ टक्के), पूर्णामध्ये ३५.०४ (९९ टक्के) व सपनमध्ये ३६.९७ (९५ टक्के) जलसाठा आहे. ४५ लघु प्रकल्पांतही समाधानकारक जलसाठा असून एकूण प्रकल्पीय जलसंचय क्षमतेच्या तुलनेत १८३ दलघमी (८७ टक्के) साठा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘पोपटखेड’चे ‘ओव्हर फ्लो’ पाणी पणज प्रकल्पात सोडा

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा बघता यंदा हरभरा व गव्हाच्या सिंचनासाठी लागणारे पाणी पूर्ण क्षमतेने पुरवता येणार आहे. गव्हाला पाच ते सात पाळ्या साधारणतः पाणी देण्यात येते. तर हरभऱ्यास दोन पाळ्या पुरेशा होतात. शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी आल्यास नियोजन करून पुरवठा करता येणार आहे, असे जलसंपदा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा

धरण उपलब्ध साठा (दलघमी) टक्केवारी

अप्पर वर्धा ५६४ १००

शहानूर ४४.४८ ९६.६१

चंद्रभागा ४१.२५ ९९.९९

पूर्णा ३५.०४ ९९.०६

सपन ३६.९७ ९५.७८

पंढरी १८.४६ ३२.७२

बोर्डी नाला २.०८ ३८.३१

४५ लघु प्रकल्प १८३.१४ ८७.४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com