Rabi Season : रब्बीसाठी साडेतीन लाख मिनीकिटचा होणार पुरवठा

Seed For Rabi Season : राज्यात चालू रब्बी हंगामात ७१ हजार हेक्टरवर ज्वारी व मसूर पिकासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाख मिनीकिट पुरवठा केला जाईल.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Pune News : राज्यात चालू रब्बी हंगामात ७१ हजार हेक्टरवर ज्वारी व मसूर पिकासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाख मिनीकिट पुरवठा केला जाईल. मिनीकिट वितरणासाठी पावणेसहा कोटी रुपये खर्च केले जातील, असे कृषी विभागाच्या रब्बी हंगाम आढावा बैठकीत सांगण्यात आले.

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण तसेच राज्यभरातील कृषी व संलग्न विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना दोन किलो वजनाची ३.३० लाख ज्वारी किट ६६ हजार हेक्टरसाठी दिले जातील.

तसेच, पाच हजार हेक्टरसाठी आठ किलोची मसुराची २५ हजार किट राज्यभर दिल्या जातील. याशिवाय ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’अंतर्गत दहा वर्षांच्या आतील व १० वर्षांवरील बियाण्यांच्या वाणांचा उपयोग करीत ५.३३ लाख हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्याचा यंदाचा अन्न व पोषण सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम ३३७ कोटींचा आहे. यातून भात, गहू, मका, कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पिकांसाठी प्रात्यक्षिके घेतली जातील.

Kharif Sowing
Seed For Rabi Season : रब्बीसाठी ७५ हजार १३९ क्विंटल बियाण्यांची गरज

कापूस पिकाखालील कमाल क्षेत्र कडधान्याखाली आणणे, हरभऱ्यावरील मर रोगाचे नियंत्रण करणे, ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापनावर भर देणे, उसात हरभऱ्यासारख्या आंतरपिकांना प्रोत्साहन देणे, सुधारित कृषी अवजारांचा वापर वाढविणे तसेच काढणी पश्चात हाताळणी, प्रक्रिया करून मूल्यवर्धन आणि साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

रब्बी हंगाम यंदाचा ५९ लाख हेक्टरवर घेतला जाईल. त्यासाठी ९.४१ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. या तुलनेत बियाण्याची उपलब्धता राज्यात ११७ टक्के म्हणजेच ११ लाख क्विंटलच्याही पुढे आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी बाजारात सध्या ज्वारीचे ४२ हजार १७५ क्विंटल तर गहू ४.४४ लाख क्विंटल, मका ७५ हजार ६०० क्विंटल, हरभरा ५३१५५४ क्विंटल, करडई ५९९१ तर इतर पिकांचे १००९१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

Kharif Sowing
Rabi Season : आटलेले जलस्रोत अन्‌ रब्बीच्या नियोजनाचे आव्हान

बियाण्यांप्रमाणेच रासायनिक खतांचा साठादेखील पुरेसा आहे. गेल्या दोन हंगामांमध्ये सरासरी खत मागणी २६.९० लाख टन इतकी होती. यंदा २९.६० लाख टन खतांचा पुरवठा केला जाईल. १६.७४ लाख टन खते बाजारात सध्या उपलब्ध आहेत, असे गुणनियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले.

...अशी आहे रब्बीची तयारी

- ज्वारी, मसूर पेरा वाढीसाठी साडेतीन लाख मिनीकिटचा पुरवठा

- मिनीकिट वितरणासाठी पावणेसहा कोटी रुपये

- ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ अंतर्गत ५.३३ लाख हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

- २९.६० लाख टन खतांचा पुरवठा केला जाणार

- मागणीच्या तुलनेत राज्यात बियाण्याची उपलब्धता जास्त. ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध.

- अन्न व पोषण सुरक्षा अभियानासाठी ३३७ कोटींची तरतूद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com