Village Development  Agrowon
ॲग्रो विशेष

Village Development : गावाचा मानवी विकास निर्देशांक अन् आनंदाचा निर्देशांक

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

मानवी विकास निर्देशांक आणि आनंदाचा निर्देशांक या दोघांमध्ये संतुलन असणे अत्यंत गरजेचे आहे.

यासाठी आपली ग्रामपंचायत (Grampanchyat) बळकट आणि एक दिशेने काम करणारी असल्यास हे बदल निश्चित दिसतात. गट, तट, विरोध हा केवळ निवडणुकांपुरता (Grampanchyat Election) मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

आता सर्वांनी एकत्र मिळून समविचाराने गावाच्या विकासासाठी (Village Development) झोकून देऊन काम करणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीच्या सर्व बैठका सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येतात. यासाठी सरपंचानी बैठकीची पूर्व तयारी अभ्यासपूर्ण पद्धतीने करणे योग्य राहील.

बैठकीचा अजेंडा/उद्देश्य, हेतू याबाबत स्पष्टता असावी. बैठक सुरू होण्याचा आणि संपण्याचा वेळ निश्चित असावा.

मुद्देनिहाय आणि विषयनिहाय बैठक घ्यावी. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी संगणक साक्षर होणे अपरिहार्य नवे क्रमप्राप्त आहे.

सरपंचांनी प्रत्येक बैठक जर शक्य असेल तर संगणक आणि प्रोजेक्टरचा वापर करून घेणे गरजेचे आहे.

पल्याला जे मांडावयाचे आहे त्याची आधी नीट आखणी करून ते पॉवर पॉइंटच्या स्वरूपात मांडणी केल्यास लोकांना दृक्‌श्राव्य माध्यमातून त्याचे नीट आकलन होते.

उचित ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र शासनाने अनेक विषयावर केलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि माहिती याचा वापर करावा.

बैठकांचे स्वरूप :

ग्रामसभा बैठका :

प्रत्येक वित्तीय वर्षात विहित करण्यात येतील अशा तारखेस आणि वेळेस ग्रामसभेच्या निदान चार सभा घेणे बंधनकारक आहे.

यात कसूर केल्यास शास्ती होवू शकते. सरपंचास कोणत्याही वेळी ग्रामसभेची बैठक बोलावता येऊ शकते.

त्याच प्रमाणे स्थायी समिती, पंचायत समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केल्यावर बैठक बोलावली जाते.

मासिक बैठका :

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभा बाबत) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक आहे.

बैठकीचे इतिवृत्त :

या प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त बैठकीनंतर लगेचच अंतिम करावे. इतिवृत्तामध्ये विलंब करू नये.

बैठकांचे नियोजन :

एकूण निदान चार ग्रामसभा आणि १२ मासिक सभा यांचे एकत्रित कॅलेंडर वित्तीय वर्षाच्या पूर्वीच करावे म्हणजे त्यांचे नियोजन आणि सकस कामकाज करता येते. गावाच्या समस्यांचे आकलन आणि

उपाय: माझ्या गावच्या अथवा माझ्या वार्डाच्या समस्या काय आहेत त्या समस्यांना मला दूर करण्यासाठी नेमके काय करावे लागेल?

याबाबत स्पष्टता असल्यास समस्या दूर करण्यासाठी योजनांचा आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग करून घेता येऊ शकतो.

ग्राम विकासाचे नियोजन ः

आपण एक उदाहरण घेऊयात. एका ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या सुमारे अडीच हजार आणि ग्रामपंचायत सदस्य सात असे असल्यास सरपंच सर्व गावाचा प्रमुख म्हणून काम करणार असेल

आणि प्रत्येक वार्डामधून ग्रामपंचायत सदस्य निर्वाचित असेल. संपूर्ण गावाच्या समस्या एकत्रित करण्यासाठी व्यक्तीच्या समस्या, कुटुंबाच्या समस्या,

आपण राहत असतो त्या त्या वॉर्डाची समस्या यांची नेमकी आखणी करणे गरजेचे आहे.

विकासाचे आकलन :

बराच वेळा असे निदर्शनास येते की, वार्डाचा विकास करणे किंवा गावाचा विकास करणे म्हणजे केवळ मूलभूत सुविधा अथवा बांधकाम बघून कामांची रेलचेल असावी अशी बऱ्याच जणांची प्राथमिकता असल्याचे जाणवते.

यासाठी मग विविध स्तरावरून मिळणाऱ्या निधीची मागणी आणि शोध सुरू होतो. या चढाओढीत नेमक्या गरजा मागे पडतात.

गावाचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास होय आणि यामध्ये मागील लेखात चर्चा केल्याप्रमाणे नऊ संकल्पनांवर विकासाची विगतवारी करण्यात येते.

या नव संकल्पना वर काम करण्यासाठी मला नेमके काय करावे लागेल याची आपल्याकडे अद्यावत माहिती हवी.

ग्रामपंचायतीची प्रशासकीय रचना

प्रत्येक ग्रामपंचायतीला एक सचिव असतो. तसेच काही कर्मचारी देखील असतात. या सर्वांसाठी एक विशेष बैठक घेणे गरजेचे आहे.

या बैठकीमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व स्टाफची बैठक घेऊन एक विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

त्यानंतर प्रत्येक वॉर्डातून जे सात स्वयंसेवक त्या सदस्यांनी निवडले आहेत त्या सर्वांचे एकत्रित बैठक एखाद्या हॉलमध्ये घेणे आणि त्यांना सर्व कल्पना देणे आवश्यक आहे.

सरपंचाला ग्राम विकासासाठी अभ्यासू वृत्ती वाढावी लागेल. गावामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पशुसंवर्धन अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी कृषी सेवक, इत्यादी जे सर्व ग्रामस्थ आहेत त्या सर्वांची एक वेगळी बैठक घेणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीच्या किती बैठका घ्याव्यात यासाठी कमाल मर्यादा नाही, मात्र या बैठका अतिशय चांगल्या वातावरणामध्ये घेणे गरजेचे आहे.

(लेखक - डॉ. सुमंत पांडे माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे ९७६४००६६८३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT