डॉ. राहुल शेलारEco Friendly Farming: कार्बन शेतीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषला जातो आणि तो मातीमध्ये सेंद्रिय कार्बनच्या रूपात साठवला जातो. कार्बन डायऑक्साइड हा एक प्रमुख हरितगृह वायू आहे, जो जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरतो.हरितगृह वायू उत्सर्जन कमी : कमी नांगरट, रासायनिक खतांचा कमी वापर आणि पिकांचे अवशेष जमिनीत मिसळणे यांसारख्या पद्धतीमुळे शेतीमधून होणारे नायट्रस ऑक्साइड आणि मिथेन यांसारख्या इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी होते..जैवविविधता वाढवणे : सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणात आणि जमिनीची रचना सुधारल्याने मातीतील सूक्ष्मजीव, कीटक आणि इतर लहान जीवांची संख्या वाढते. कृषीवनीकरण पद्धतीमुळे पक्षी आणि इतर वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण होतो.पाणी गुणवत्ता सुधारणा : जमिनीची धूप कमी झाल्यामुळे आणि रासायनिक खतांचा वापर टाळल्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण कमी होते. मातीतील सेंद्रिय पदार्थ पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे नद्या, तलाव आणि भूजलाची गुणवत्ता सुधारते..जमिनीसाठी फायदेजमीन सुपीकता वाढ : सेंद्रिय कार्बन जमिनीसाठी एक महत्त्वाचे पोषणद्रव्य आहे. यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते. आवश्यक अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.जलधारण क्षमता वाढ : सेंद्रिय पदार्थ मातीची रचना सुधारतात, ज्यामुळे मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. दुष्काळासारख्या परिस्थितीतही पिकांना अधिक काळ पाणी उपलब्ध राहते..Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे .माती रचना सुधारणा : सेंद्रिय कार्बनमुळे मातीच्या कणांचे एकत्रीकरण होते, ज्यामुळे मातीची रचना भुसभुशीत होते. हवा खेळती राहते, मुळांना वाढण्यासाठी चांगली जागा मिळते, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो.धूप नियंत्रण : कमी नांगरट आणि आच्छादन पिके वापरल्याने माती उघडी राहत नाही. यामुळे पाणी आणि वाऱ्यामुळे होणारी मातीची धूप मोठ्या प्रमाणात कमी होते, ज्यामुळे जमिनीचा सुपीक थर टिकून राहतो..सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन : सेंद्रिय कार्बन मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी अन्न आणि योग्य वातावरण पुरवतो. हे सूक्ष्मजीव मातीतील पोषणद्रव्यांचे चक्र पूर्ण करण्यास मदत करतात, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.रासायनिक खतांचा कमी वापर : जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते. नत्र स्थिरीकरणामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो..शेतकऱ्यांसाठी फायदेउत्पन्नात वाढ : सुपीक जमीन, योग्य जल व्यवस्थापन आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. कार्बनचे प्रमाण वाढल्यास पिकांची गुणवत्ताही सुधारते.खर्चात बचत : रासायनिक खते, कीटकनाशके आणि सिंचनासाठी लागणारे पाणी यांचा वापर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च घटतो. कमी नांगरटीमुळे इंधनाची बचत होते.कार्बन क्रेडिट्सपासून उत्पन्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्बन क्रेडिट मार्केट विकसित होत आहेत. जे शेतकरी आपल्या शेतीत कार्बन साठवणूक करतात, त्यांना या कार्बन साठवणुकीसाठी ‘कार्बन क्रेडिट्स’ मिळतात. हे क्रेडिट्स ज्या कंपन्यांना त्यांच्या कार्बन उत्सर्जनाची भरपाई करायची असते, त्यांना विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात..जोखीम व्यवस्थापनकार्बन शेतीच्या पद्धतीमुळे जमीन अधिक लवचिक बनते, हवामान बदलाच्या परिणामांना (उदा. दुष्काळ, अतिवृष्टी) अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकते.दीर्घकालीन शाश्वतता : जमिनीचे आरोग्य सुधारल्याने पुढील पिढ्यांसाठीही जमीन उत्पादनक्षम राहते.माती आरोग्य, पाण्याचे संवर्धन : उत्तम मातीचे आरोग्य आणि कार्यक्षम पाणी वापरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची उत्पादकता दीर्घकाळ टिकते..Organic Farming : शिक्षिकेने धरली जैविक शेतीची कास .महत्त्वाचा ‘कार्बन सिंक’माती ही पीक लागवडीच्या बरोबरीने वातावरणातील कार्बन शोषून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्याची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. जगातील सुमारे १५०० ते २३०० अब्ज टन कार्बन जमिनीच्या वरच्या केवळ एक मीटर थरात साठलेला आहे. ही प्रचंड मात्रा वातावरणात असलेल्या एकूण कार्बनच्या जवळपास तीन पट आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते, की जर आपण जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवले, तर हवामान बदलाचे धोके कमी करण्यासाठी आपण मोठा आणि निर्णायक हातभार लावू शकतो..मातीतील कार्बन मुख्यतः सेंद्रिय पदार्थांमधून येतो. यामध्ये वाळलेल्या पानांचे अवशेष, पिकांचा काडीकचरा, शेणखत आणि इतर सेंद्रिय खते, तसेच वनस्पतींच्या मुळांपासून आणि सूक्ष्मजीवांपासून तयार होणारे घटक यांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ जमिनीत मिसळल्यानंतर सेंद्रिय कर्ब तयार करतात. मातीतील सूक्ष्मजीव (जिवाणू आणि कवक) वनस्पतींच्या मृत अवशेषांमधून कार्बनला सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतरित करून दीर्घकाळ टिकवतात.जर एखाद्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण केवळ एक टक्याने वाढवले, तर त्या जमिनीमध्ये प्रति हेक्टर सुमारे २५ ते ३० टनांपर्यंत कार्बन साठवता येऊ शकतो. यामुळे माती केवळ कार्बन साठवणूक करणारी जागा राहत नाही, तर ती हवामान बदलावर परिणाम करणाऱ्या एका प्रभावी नैसर्गिक उपाययोजनेचा अविभाज्य भाग बनते..चराऊ कुरणांचे व्यवस्थापनकुरणांमध्ये जनावरे चरण्याची पद्धत नियंत्रित करावी. यात फिरती चराई किंवा नियोजित चराई यांसारख्या पद्धतींचा समावेश होतो. जनावरांना ठरावीक वेळेसाठी ठरावीक क्षेत्रात चरण्यासाठी सोडले जाते आणि नंतर त्यांना दुसऱ्या भागात हलवले जाते, ज्यामुळे गवताला पुन्हा वाढण्याची संधी मिळते.फायदेगवताची वाढ चांगली होते, ज्यामुळे अधिक कार्बन वातावरणातून शोषला जातो.गवताची मुळे खोलवर जाऊन मातीतील कार्बन साठा वाढवतात.धूप कमी होते. जमिनीची सुपीकता वाढते..पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापनठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा. पावसाच्या पाण्याचा संचय (उदा. शेततळे, बांधबंदिस्ती) करावा.फायदेपाण्याचा योग्य वापर केल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो.जमिनीतील कार्बनचे प्रमाण टिकवून ठेवण्यास अप्रत्यक्षपणे मदत करते..सुधारित जाती आणि तंत्रज्ञानउच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींचा वापर करणे, ज्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळते आणि जमिनीवरचा ताण कमी होतो. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून शेताचे नियोजन करावे.फायदेप्रतियुनिट क्षेत्रात अधिक कार्बन स्थिरीकरण होते.शेती अधिक कार्यक्षम होते, ज्यामुळे संसाधनांचा कमी वापर होतो.जमिनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत करते.डॉ. राहुल शेलार ९८८१३८०२२७(मृद् व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.