Dalmia Sugar Factory Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Dalmia Sugar Factory Kolhapur : दालमिया शुगर्सच्या धोरणामुळे विकास सेवा संस्था अडचणीत, सतेज पाटील यांना निवेदन

Dalmia Sugar Factory : आसुर्ले पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात उसाचे बील थेट जमा केले जात आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Farmer : आसुर्ले पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात उसाचे बील थेट जमा केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोसायटीतून घेतलेल्या कर्जाची रक्कम कट होत नसल्याने विकास सेवा संस्थांची अडचण होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान याबाबत कारखाना कार्यक्षेत्रातील विकास सेवा संस्थांनी याबाबत आवाज उठवला आहे. कारखान्याच्या धोरणाविराधात निवेदन तयार करत करवीर तालुक्यातील अनेक विकास संस्थांनी, माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व दालमिया शुगरच्या प्रशासनास दिले.

निवेदनात म्हटले आहे की, ऊस पिकवताना उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात पैसे, विविध शासकीय योजनांचा लाभ खते, पाणीपुरवठा, आदी गरजा विकास सेवा संस्था देत असतात.

मोबदल्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्था आपली वसुली करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देत असतात; पण कारखान्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यास विकास संस्था वसुलीअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर निगवे दुमाला, शिये, भुये, भुयेवाडी, केर्ली, केलें, वरणगे, वडणगे, कुशिरे पोहाळे आदी गावातील विकास सेवा संस्थेच्या पदाधिकाच्यानी एकत्र येऊन यासंदर्भात माजी मंत्री सतेज पाटील व जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. तसेच कारखाना प्रशासनास निवेदन दिले.

पूर्वीप्रमाणे सात दिवसांत ही रक्कम जिल्हा बँक आणि विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आग्रह धरला. तसे न झाल्यास विकास संस्था आंदोलन उभे करून कारखाना बंद पाडतील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.

यावेळी जय हिंद विकास सेवा संस्थेचे बाळासाहेब शिरोळकर, हनुमान विकास संस्थांचे जयसिंग काशीद, प्रकाश पाटील, शिवाजी कुशीरकर, मारुती उतरेकर आदी संचालक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

Mushroom Processing: अळिंबीचे २४ नवे प्रकल्प

Soil Health: मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता

Maize MSP: हमीभावाने मका खरेदी सुरू

Weather Update: चार दिवस थंडी कमी राहणार

SCROLL FOR NEXT