Sangli News : देशातील मृग हंगामातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असली, तरी अजूनही फारशी गती आली नाही. दिवाळीपूर्वी दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये प्रति किलो असा दर मिळत होता.
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली पण अपेक्षित उठाव होत नसल्याने डाळिंबाच्या दरात प्रति किलोस २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी, दरात घसरण झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट ओढावले असल्याचे चित्र आहे.
देशात यंदाच्या हंगामात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मृग बहर साधला आहे. डाळिंबाची काढणी सुरू झाली असून, आतापर्यंत अंदाजे २५ ते ३० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची काढणी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी डाळिंबाला १२५ ते १३० रुपये असा दर मिळाला होता.
हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला प्रति किलोस ३० ते ३५ रुपयांनी दर वाढून चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलोस १५५ ते १६५ रुपये असा दर मिळाला. दरात वाढ झाली असल्याने डाळिंब दर वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर डाळिंब काढणीला गती आली आहे. परंतु अजूनही फारशी गती नाही. मात्र डाळिंबाचे दर फार काळ टिकू शकले नाही. परंतु देशभरातील डाळिंब बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढली आहे.
परंतु डाळिंबाला अपेक्षित उठाव नाही. याचा परिणाम दरावर झाला. त्यामुळे डाळिंबाच्या दरात प्रति किलोस २५ ते ३० रुपयांनी घसरण झाली आहे. दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १३५ रुपये असा दर मिळत आहेत.
वास्तविक पाहता गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डाळिंबावर पिन होल बोरर सारख्या रोगाचा प्रादुर्भावाने डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकऱ्यांना योग्य नियोजन करत बागा साधल्या आहेत. अशा परिस्थितीतही डाळिंबाला सरासरी प्रति किलोस १०० रुपयांच्या पुढे दर मिळाले असल्याचे दिसते आहे.
देशातून सुमारे ६० ते ७० टक्के डाळिंब बांगलादेशला विक्रीसाठी जाते. या वर्षीच्या हंगामात बांगलादेशमध्ये डाळिंबाला १७५ रुपये असा दर मिळाला. बांगलादेशातही डाळिंबाला मागणी आणि उठावही चांगला असतो. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून मागणी कमी झाली आहे. परिणामी डाळिंबाच्या दरात प्रति किलोस १५० रुपये असा दर मिळतोय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.