Vighnahar Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : ‘विघ्नहर’चे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

गणेश कोरे

Pune News : ‘‘विघ्नहर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २४ हजार ७१५ एकर उसाची नोंद झाली आहे. यंदा १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, तोडणी व गाळपाचे नियोजन केले आहे.

शासनाचे धोरणानुसार गाळप सुरू करण्यात येणार आहे. नोंद झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार आहे. या कामी ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले.

निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर व त्यांच्या पत्नी मोनिका यांच्या हस्ते सोमवारी (ता. १०) झाला.

अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप हे होते. कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार्यकारी संचालक घुले म्हणाले की, कारखान्याने देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण केलेली असून कारखाना ऊस गाळपाकरिता सज्ज झाला आहे. अनिल मेहेर म्हणाले की, पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने पाणी बचतीचे धोरण ठरवावे लागणार आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील नेतृत्वाने पाणी बचतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कृषी विज्ञान केंद्रामार्फत परदेशातून उसाच्या नवनवीन जातींचे वाण आणून त्यावर संशोधन करून नवीन वाण विकसित करण्यात येत आहेत. त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा.

या प्रसंगी विघ्नहर ट्रस्ट संचलित स्व. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी शाल्मली शिंदे हिला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक व विभागीय स्पर्धेत ब्रॉंझ पदक आणि साई जगताप यास जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याबद्दल सत्कार केला. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विवेक काकडे यांनी आभार मानले.

या वर्षी पाऊस कमी झाल्याने कार्यक्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उसाचे सरासरी एकरी उत्पादन घटणार आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस जाण्याची शक्यता आहे. विघ्नहर साखर कारखाना सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची यंदाही दिवाळी गोड करणार आहे.
- सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT