Agrowon Business Excellence Awards 2022
Agrowon Business Excellence Awards 2022 Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Business Excellence Awards 2022 : सुदृढ पशुधनातून विकासाची कास हाच वेट्रिनाचा ध्यास

Team Agrowon

डॉ. मंगेश घाडिगावकर

एखाद्या हाडाच्या शेतकऱ्यासाठी त्याची जनावरे (Animal) किती महत्त्वाची असतात ते वेगळे सांगायला नको. शेतकऱ्याचे (Farmer) हे पशुधन अधिक सुदृढ होऊन त्यांच्यापासून उत्तम दर्जाचे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी जनावरांचा आहार आणि त्यातून त्यांना मिळणारी पोषकमूल्ये यावर भर द्यावा लागतो. या विषयात शेतकऱ्यांचा मदतनीस बनलेली कंपनी म्हणजे पुण्यातील वेट्रिना हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड. व्हेटरिनाची उत्पादने शेतकऱ्यांना फक्त माल विकत नाहीत तर त्यांच्या सगळ्या शंका दूर करून शेतकऱ्याशी आणि त्यांच्या जनावरांशी बांधिलकी जपतात.

वेट्रिनाचा पाया रोवला डॉ. मंगेश घाडिगावकर यांनी. त्यांचा जन्म तळ कोकणात एका शेतकरी कुटुंबातला. घरची भातशेती स्वत:पुरती असल्यामुळे घरची परिस्थती बेताचीच. अत्यंत कष्टातून शिक्षण घेत असतानाच त्यांनी ठरवले होते की मोठेपणी शेती क्षेत्राशी निगडित शिक्षण घ्यायचे आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे.

नावामागे डॉक्टर लावायचीही खूप इच्छा होती. डिसेंबर १९९८ मध्ये त्यांनी मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकशास्त्रात शिक्षण पूर्ण केले. तेव्हा आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण इच्छा असून घेता आले नाही. अर्थार्जनासाठी लगेचच १९९९ च्या सुरुवातीला नोकरीला सुरुवात केली.

औषध कंपनी आणि आहारपूरक घटक कंपनी अशा दोन कंपन्यांमध्ये प्रत्येकी सहा-सहा वर्षे मार्केटिंगमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले, की पाच वर्षे कॉलेजमध्ये आणि नंतर १२ वर्षे नोकरी केल्यानंतर जे काही ज्ञान, अनुभव मिळवला त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करता येत नाहीए. हा अनुभव आणि ज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयोगात आणायचा असेल तर आपल्याला नोकरी सोडून व्यवसाय करणे गरजेचे आहे. तरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्यात बदल घडवू शकतो.

आपले या विषयातील औपचारिक शिक्षण आणि बारा वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव यातून शेतीसाठी, दुग्ध व्यवसायासाठी, जनावरे बाळगण्यासाठी आवश्यक असे अनुकूल शास्त्र आणि उत्पादने यांची माहिती आपण नक्की देऊ शकतो, या विश्‍वासातून त्यांनी जुलै २०१२ मध्ये वेट्रिना हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली.

त्या वेळी एक साधे उद्दिष्ट समोर होते - पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी सोपा आणि फायदेशीर बनवणे. आपण बऱ्याचदा पाहतो की दुग्ध व्यवसाय, शेती, पशुपालन हे पारंपरिक पद्धतीनेच केले जातात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. पशुपालन व्यवसायात विशेषतः दुग्ध व्यवसायात गायी आणि म्हशी दुधासाठी बाळगत असताना त्यांच्याकडून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्यांना आहार कोणत्या पद्धतीचा दिला पाहिजे याचे ज्ञान, माहिती एक तज्ज्ञ म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय फायदेशीर करून देणे, या उद्देशाने कंपनी सुरू केली.

जर आपले ध्येय चांगले असेल, हेतू उदात्त असतील तर आपल्याला तिथपर्यंत जाणे सहज शक्य असते, असे डॉ. घाडिगावकर सांगतात. जनावरांचा आहार आणि पूरक घटक या क्षेत्रामध्ये एक नावीन्यपूर्ण आणि विश्‍वासार्ह कंपनी निर्माण करणे, हे ध्येय ठरवून त्यांची दहा वर्षे वाटचाल सुरू आहे.

‘नव्याने व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल लागते, त्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही असा एक समज असतो. पण माझ्या बारा वर्षांच्या अनुभवावरून मला वाटते, की व्यवसायाला लागणारा पैसा पुरवण्यासाठी बँक, गुंतवणूकदार असतात. आपल्याकडे एखादी नावीन्यपूर्ण कल्पना, योजना असेल आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसायात उतरायचे असेल तर पैसा कधीच अडथळा ठरत नसतो.

याच विचारातून मी व्यवसायाची सुरुवात केली. शेतकऱ्यांना जनावरांपासून जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी जनावरांच्या आहारावर संशोधन केले, काही उत्पादने तयार केली आणि ती शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले,’’ असे डॉ. घाडिगावकर यांनी सांगितले.

वेट्रिनाची सुरुवात त्यांनी भागीदारीत केली, पण पहिल्या तीन वर्षांत भागीदार बाहेर पडल्यामुळे त्यांनी पुढची वाटचाल एकट्याने केली. त्यासाठी बँकेकडून घरावर काढलेले रु २० लाख कर्ज आणि नंतर अडीच कोटीचे कर्ज या जोरावर वाटचाल करत आज मितीला वेट्रिनाची वार्षिक उलाढाल रु २५ कोटीच्या घरात आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेतीला प्रथम प्राधान्य आणि त्याला जोड देऊन दुय्यम व्यवसाय, जसे की - पशुपालन व्यवसाय सुरू करणे. पण आता पशुपालन हा दुय्यम व्यवसाय राहिला नाही तर मुख्य व्यवसाय बनला आहे, या व्यवसायाची पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कंपनी कार्यरत केली.

त्यांना कंपनी सुरू करताना अडचणी नक्की आल्या. नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर ग्राहक लगेच विश्‍वास ठेवत नाहीत. जोपर्यंत त्याची उपयुक्तता, फायदे लक्षात येत नाहीत तोपर्यंत ते विकत घेतले जात नाहीत. यामध्ये फक्त उत्पादक आणि ग्राहक नसतात तर यामध्ये वितरकांची साखळी असते त्याला ही सामोरे जावे लागते. या सगळ्या साखळीतून विक्रीचे पैसे आपल्या खात्यात येईपर्यंत आपल्याला व्यवसायात पाय रोवता येत नाही.

नवीन कंपनी असल्यामुळे वितरकांच्या साखळीमध्ये त्यांना त्रास झाला. त्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध करून दिली जात नव्हती, झिडकारून दिले जायचे. वितरकाकडे माल पडून राहिला असेल तर त्यांचे पैसे मिळत नव्हते. आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. उत्पादनांची गुणवत्ता उत्तम ठेवल्यामुळे त्यांना उत्पादनाचा खर्च जास्त यायचा पण ही उत्पादने जास्त किमतीने ते शेतकऱ्यांना विकू शकत नव्हते.

शेतकऱ्यांना उत्पादने कमी किमतीत विकता यावीत यासाठी त्यांनी ‘नेट झोन’ या संकल्पनेची निर्मिती केली. ‘फॅक्टरी ते फार्म’ म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये जी उत्पादने बनतात ती योग्य माहितीसह शेतकऱ्यांना त्यांच्या दारात उपलब्ध करून देणे. या उत्पादनाचे फायदे काय, का दिले पाहिजेत, कसे दिले पाहिजे अशी पूर्ण माहिती इथे शेतकऱ्यांना दिली जाते. त्यामुळे शेतकरी वेट्रिनावर विश्‍वास ठेवायला लागले आहेत, संवाद वाढायला लागलाय, असे डॉ. घाडिगावकर नमूद करतात. या प्रवासात अडथळे अनेक आले.

काही संघटनानी त्यांची उत्पादने वापरू नयेत म्हणून त्यांच्या उत्पादनावर निर्बंध आणायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांमध्ये व्हेटरिनाच्या उत्पादनाविषयी संभ्रम, शंका निर्माण केल्या. याचा त्यांना नाहक त्रास झाला, असे सांगून डॉ घाडिगावकर म्हणाले, की त्यांचा उद्देश स्पष्ट आणि पारदर्शक असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले, की त्यांची उत्पादने जनावरे आजारी पडू नयेत यासाठी आहेत. आणि शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी पुन्हा मिळवला.

याच विश्‍वासाच्या जोरावर आज देशभरातील हजारो शेतकरी ग्राहकांपर्यंत आणि कॉर्पोरेट ग्राहकांपर्यंत ते पोहोचले आहेत. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या अशा प्रत्येक जनावराला त्यांच्या वाढीचा टप्पा आणि शरीररचनेनुसार बदल करत आहारपूरक घटक पुरवणे, जनावरांना रोगमुक्त ठेवणे, त्यांचे आहार व्यवस्थापन, जनावरांचे लसीकरण, अशी नावीन्यपूर्ण उत्पादने वेट्रिनामध्ये उपलब्ध आहेत.

कुठल्याही कंपनीने यापूर्वी अशाप्रकारची उत्पादने बनवण्याचा यापूर्वी कधीही प्रयत्न केलेला नव्हता, असे सांगून डॉ. घाडिगावकर म्हणाले, की त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी उत्पादने वापरली त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झाला. विशेषतः ‘कालवड संगोपना’ची संकल्पना शेतकऱ्यामध्ये रुजवली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आज पंजाब, बंगळूरकडे जात नाही तर स्वतःच्या गायी स्वतःच्या गोठ्यात स्वतः तयार करतो.

वेट्रिनाचा ४०% व्यवसाय हा व्यवसाय ते व्यवसाय या स्वरूपाचा असून, त्यांच्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट ग्राहकामध्ये दुग्ध व्यवसायात भाग्यलक्ष्मी डेअरी, मंचर; सिरन कांचाल सारडा, नाशिक; कात्रज डेअरी, पुणे; गोकुळ दूध संघ, कोल्हापूर आणि राजाराम बापू दूध उत्पादक संघ तर कुक्कुटपालनात पोल्ट्री प्रीमियम चिक्स प्रिट प्रायव्हेट लिमिटेड, ए. व्ही. बॉयलर्स, नाशिक यांचा समावेश आहे.

वेट्रिना हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे

८६००८४४४५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT