Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

तातडीने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी अनुदान देण्यात येऊन महावितरणच्या वतीने सुरू असलेली वीजपुरवठा तोडण्याची मोहीम थांबविण्यात यावी.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

पाचोड : तातडीने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीपोटी (Crop Damage Compensation) अनुदान देण्यात येऊन महावितरणच्या वतीने सुरू असलेली वीजपुरवठा (Electricity Power Supply) तोडण्याची मोहीम थांबविण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवारी (ता. २९) सकाळी पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी (ता. पैठण) फाट्यावर शेतकरी (Farmer) कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने दीड तास ‘रास्ता रोको’ करण्यात आला.

Crop Insurance
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, दत्तात्रय गोर्डे, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस चंद्रशेखर सरोदे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख प्रमुख ॲड. किशोर वैद्य, सर्कल प्रमुख श्याम तांगडे, मिठ्ठुसेठ मोदाणी, मुस्तफा पठाण, दीपक हजारे आदींनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठा तत्काळ सुरू करत नाहीत, अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मदत, पीकविमा मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरूच राहणार असून सर्वप्रथम अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, आम्ही त्या रकमेतून वीजदेयके भरतो, असे सांगून पैठण तालुक्याच्या नेतृत्वावर सडकून टीका केली.

यावेळी शेतकऱ्यांनीही राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तरी तालुक्याला त्यातून वगळले, यावरून तुघलकी कारभार चालवून वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खाईत लोटले जात आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकऱ्यांनी सत्ताधारी नेतृत्वासह महावितरण व महसूल विभागाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला.

Crop Insurance
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

यावेळी आंदोलकांनी दोन्ही बाजूने रस्त्यावर दुचाक्या आडव्या लावून रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडला. जवळपास दीड तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या दीड दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी पैठणचे नायब तहसीलदार जी. टी. आवळे, बालाजी कांबळे, दावरवाडी महावितरणचे सहायक अभियंता प्रदीप सोमवंशी यांनी निवेदन स्वीकारून आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

या वेळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्यासह पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, फौजदार सुरेश माळी, जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या वेळी पोलिस पाटील गोपाल वैद्य, दिनकर एडके, अशोक सरगर, किशोर नाडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com