Animal Husbandry Minister Pankaja Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Veterinary Colleges : बारामती, परळीत साकारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय

Animal Husbandry Minister Pankaja Munde : ‘‘या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता बारामतीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल,’’ अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Team Agrowon

Baramati News : ‘‘या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता बारामतीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल,’’ अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

बारामतीत गुरुवारी (ता. १६) ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘बारामतीत सर्वच सुविधा झाल्या आहेत, मात्र या परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुदृढ आरोग्यासाठी बारामतीत उत्तम दर्जाचा पशुवैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही गरज बोलून दाखवली आहे, असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला तातडीने मंजुरी देऊ.’’

दरम्यान, अजित पवार म्हणाले, की बारामती व परळीसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करा त्याला मी अर्थमंत्री म्हणून मान्यता देतो, असे सांगत बारामतीसोबतच परळीलाही असा पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे पंकजा मुंडे यांना सुचविले. यामुळे आता बारामती व परळीतही पशुवैद्यकीय महाविद्यालय लवकरच साकारणार हे स्पष्ट झाले आहे.

‘खुल्या जागा महिला बचत गट, शेतकऱ्यांना द्याव्यात’

या कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे राज्यात उपलब्ध असलेल्या शहरातील खुल्या जागा (ओपन स्पेस) काही ठिकाणी महिला बचत गट व शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी आरक्षित कराव्यात अशी मागणी केली. आठवडेबाजारात भरडधान्य विक्रीसाठीही हक्काची जागा असावी, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Superintendent Agriculture Officer: लातूरच्या ‘एसएओ’पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती

Road Project: मोहोळ-तांदूळवाडी मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Political Controversy: गाळे बांधकामाबाबतीत आरोप राजकीय हेतूने प्रेरित

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

SCROLL FOR NEXT