Heatwave Impact: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने ४० ते ४३ अंशांच्या पुढे जात असल्याने माणसांप्रमाणेच फळबागांनाही मोठा फटका बसू लागला आहे. कडक उन्हामुळे डाळिंबाची फळे तडकू (क्रॅकिंग) लागली असून, डाळिंबाच्या एकूण क्षेत्रांपैकी सुमारे ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे.