Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा लाभ आता पडताळणीमुळे लांबणीवर

Majhi Ladki Bahin Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही, दुसरीकडे शासन निर्णयातील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणीही सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही, दुसरीकडे शासन निर्णयातील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणीही सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने आहेत, त्याची सध्या पडताळणी सुरू आहे.

पण, आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत, अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का?, याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी सरकारला दरमहा सरासरी ३७०० कोटी रुपये (प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे) द्यावे लागतात. रक्कम वाढविल्यास दरमहा सुमारे १२०० कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे.

राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल, नव्या १० योजनांमुळे तिजोरीवर वाढलेला कर्जाचा भार पाहता लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणे अडचणीचे ठरू शकते, असा सल्ला नियोजन व वित्त विभागाने सरकारला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने रक्कम वाढीचा प्रस्तावच दिलेला नाही. सध्या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जाणार आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ ४ योजनांसाठी नाही निधी

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, अशा नव्या १० योजना जाहीर केल्या. योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला तब्बल एक लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले, तरीदेखील लेक लाडकी, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तिजोरीत पुरेसा निधी नाही. त्या योजनांचे लाभार्थी सध्या वेटिंगवर आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी

एकूण लाभार्थी ११,०९,४७८

चारचाकीधारक महिला १४,०००

दरमहा अपेक्षित निधी १६६.४२ कोटी

नावात त्रुटी असलेले अंदाजित १ लाखांवर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू आहे. त्यांची दैनंदिन कामे पाहून त्या पडताळणी करीत आहेत. नावात बदल किंवा त्रुटी, चुका असतील त्यांचीही चौकशी केली जात आहे. चार-पाच प्रकारच्या याद्या शासन स्तरावरून प्राप्त झाल्या असून त्यानुसार पडताळणी सुरू आहे. लाभार्थी महिलांना दोन महिन्याचे एकदम पैसे मिळू शकतात.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT