Jalna News : जालना जिल्ह्यातील शेती पीक नुकसानीसाठी प्राप्त झालेल्या ४३१ कोटी ८१ लाख रुपये मदतीपैकी १८५ कोटी १८ लाख रुपये मदत गुरुवारपर्यंत (ता. १३) वाटप झाली. तर सुमारे ७६ कोटी ८६ लाख रुपये तर रब्बीसाठी बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता अतिरिक्त १० हजार मदत वाटपाचे सुमारे ४७ कोटी ८५ लाख रुपये वाटप केवायसी अभावी प्रलंबित, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..माहितीनुसार, जालना जिल्ह्यात ६ लाख २९ हजार ६५१ शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी डीबीटीद्वारे वाटपाकरता ४३१ कोटी ८१ लाख रुपये प्राप्त झाले. मदत वाटपासाठी सुमारे ३ लाख ७६ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या याद्या २४३ कोटी ३० लाख रुपये मदत मिळण्याच्या अनुषंगाने अपलोड केल्या गेल्या. त्यापैकी २ लाख ८३ हजार ६६० शेतकऱ्यांना १८५ कोटी १८ लाख रुपयांची मदत वाटप केले गेली..Farmer Relief Fund: अहिल्यानगर जिल्ह्यात पावणेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटीची मदत जमा.तर १ लाख १६ हजार ७९५ लाभार्थ्यांची ७६ कोटी ८६ लाख रुपये मदत केवायसी मुळे प्रलंबित आहे. प्राप्त निधीच्या तुलनेत सुमारे ५६.३४ टक्के लाभार्थी याद्या अपलोड केल्या गेल्या असल्या तरी प्राप्त निधीच्या तुलनेतच सुमारे ४२.८८ टक्के निधी वाटप झाल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..३३ टक्के अतिरिक्त१० हजार रुपये अनुदान वाटप...शासनाच्या निकषाप्रमाणे रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर आनुषंगिक बाबी करता अतिरिक्त दहा हजाराची मदत शासनाने जाहीर केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ३८८ शेतकऱ्यांना देण्याकरिता ४६१ कोटी ५२ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. .प्राप्त झालेल्या या निधी पैकी २ लाख २२ हजार ८६२ शेतकऱ्यांना सुमारे १५४ कोटी १६ लाख रुपये मदत निधी वाटप करण्यात आले. प्राप्त निधीच्या तुलनेत हे मदत वाटप सुमारे ३३.४० टक्के इतके आहे. दुसरीकडे ५८,६६१ शेतकऱ्यांना वाटपाचे ४७ कोटी ८५ लाख रुपये केवायसी मुळे प्रलंबित, असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..Shivraj Singh Chauhan: शेतकऱ्यांना मदत करण्यात कुचराई करणार नाही.तालुकानिहाय अतिरिक्त दहा हजार मदत वाटप स्थिती (रक्कम कोटींत)जालना २५.४५बदनापूर १४.०३भोकरदन ३०.४४जाफराबाद ७.६०.परतूर १३.९५मंठा १९.३४अंबड २८.३८घनसावंगी १४.९८.शेतीपीक नुकसान डीबीटीद्वारे मदत वाटप (रक्कम कोटींत)जालना ३०.२५बदनापूर १४.६३भोकरदन २६.८५जाफराबाद ७.२५परतूर १६.९५मंठा १८.४४अंबड ४२.६४घनसावंगी २८.१९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.