Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत २१ हजार महिला अपात्र

Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील २० हजार ९२७ लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील २० हजार ९२७ लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर नारीशक्ती दूत अॅपवरील १७५ बहिणींचे अर्ज नामंजूर झाले आहेत. २५ बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारला असून जिल्ह्यातील ६ लाख ९६ हजार ९७३ बहिणींना लाभ देण्यात येत आहे. अपात्र लाभार्थी बहिणींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत प्रारंभी सरसकट महिलांना लाभ देण्यात आला. हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तिजोरीवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी निवडणुकीनंतर पात्रतेचे निकष निर्धारित करून आता त्या निकषांद्वारे अपात्र ठरणाऱ्या बहिणींचा शोध घेण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण’ योजनेमुळे शेतकरी अनुदान रखडले

अमरावती जिल्ह्यात ७ लाख २० हजार ६३७ बहिणींचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६ लाख ९६ हजार ९७३ बहिणींना लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. यामध्ये २० हजार ९२७ बहिणींचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.

‘लाडकी बहीण’ योजनेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, अपंग योजना अशा योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश झाला असल्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : शिंदे

या योजनांचा लाभ घेत असताना ‘लाडकी बहीण’ योजनांचाही लाभ मिळतो का, हे तपासण्यास प्रारंभ झाला आहे. असे लाभार्थी आढळल्यास त्यांचा लाभ नाकारण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तथापि अद्याप असे लाभार्थी स्पष्ट झालेले नाहीत.

२५ लाभार्थ्यांनी सोडला लाभ

‘लाडकी बहीण’ योजनेचा पंचवीस महिलांनी लाभ नाकारला आहे. त्यांनी यासंदर्भातील अर्ज देत संबंधित महिला व बालविकास विभागास कळविले आहे. ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत, अशांनी स्वतः या योजनेतून माघार घेतल्यास चांगले होईल, असे संबंधित यंत्रणेने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com