Heavy Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : वेंगुर्ल्याला पावसाने झोडपले; सावंतवाडी, कुडाळात मुसळधार

Rain Update : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून वेंगुर्ल्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तर सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्गात मुसळधार पाऊस सुरू होता.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून वेंगुर्ल्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तर सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्गात मुसळधार पाऊस सुरू होता. याशिवाय उर्वरित जिल्ह्यातदेखील पावसाचा जोर वाढल्यामुळे भातरोप पुनर्लागवडीला वेग आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस आँरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

जिल्ह्यात बुधवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. बुधवारी सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यानंतर सायकांळी पावसाचा जोर अधिकच वाढला. वेंगुर्ले तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात जोरदार पाऊस सुरू होता. याशिवाय कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, देवगड तालुक्यांत देखील पावसाच्या जोरदार सरी पडल्या.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिलारी, भंगसाळ, गड, जानवली, शुक, शांती या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.चांगल्या पावसामुळे नियमित भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत पावसामुळे भातपीक लागवड रखडली होती. परंतु आता भातरोप पुनर्लागवडीला गती आली आहे. शेतमळ्यांमध्ये पुनर्लागवडीची लगबग दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस आँरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस

देवगड ५३.३ मि.मी, मालवण ७५.१, सावंतवाडी ८८.३, वेंगुर्ला १०८ मिमी, कणकवली ६८.२ मिमी, कुडाळ ८३.२ मिमी, वैभववाडी ५७.६ मिमी, दोडामार्ग ७४.६ मिमी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

SCROLL FOR NEXT