Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking Protest: ‘लिंकिंग’मुळे खत खरेदीवर विक्रेत्यांचा राज्यभर बहिष्कार

Maharashtra Fertilizers Dealers Boycott: राज्यातील खत विक्रेत्यांनी कंपन्यांकडून होणाऱ्या ‘लिंकिंग’च्या सक्तीला विरोध करत १ मेपासून रासायनिक खतांची खरेदी थांबवली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने कृषी क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.

मनोज कापडे

Pune News: रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील खत विक्रेत्यांनी गुरुवारपासून (ता. १) खताची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‍स, सीड्‍स डीलर्स असोसिएशनची (माफदा) एक तातडीची बैठक दूरदृश्‍यप्रणालीद्वारे नुकतीच घेण्यात आली. त्यानंतर ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व सरचिटणीस विपिन कासलीवाल यांनी कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांना याबाबत पत्र दिले.

या पत्रात राज्यभर रासायनिक खतांची खरेदी बंद केली जात असल्याचे नमूद केले आहे. ‘‘मागणी नसलेली अनावश्यक इतर खते गेल्या पाच वर्षांपासून विविध कंपन्यांकडून विक्रेत्यांना पाठवली जातात. शेतकऱ्यांना या खतांची आवश्यकता नसते.

परंतु, शेतकऱ्यांना ही खते लिंकिंग (एका उत्पादनासमवेत दुसरे उत्पादन बळजबरीने विकणे) करीत विकण्यास कंपन्याच भाग पाडतात. शेतकरीदेखील ही खते घेत नसल्यामुळे विक्रेत्यांच्या गोदामात माल पडून राहतो. त्याचा आर्थिक फटका विक्रेत्यांना बसतो,’’ असा दावा ‘माफदा’ने केला आहे.

खताची टंचाई भासणार नाही

दरम्यान, कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की खरीप हंगाम २०२५ मधील खत पुरवठ्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. साधारणतः १५.५२ लाख टन युरिया, ४.६ लाख टन डीएपी, १.२० लाख टन एमओपी, ७.५० लाख टन एसएसपी आणि १८ लाख टनांच्या आसपास संयुक्त खतांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे खतांची कुठेही टंचाई भासणार नाही. विक्रेत्यांनी लिंकिंगबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत कंपन्यांना सूचना दिल्या आहेत.

शासनाच्या आदेशानंतरही लिंकिंग सुरू

लिकिंग बंद होण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर गेल्या काही वर्षांत अनेकवेळा बैठका झाल्या. चार महिन्यांपूर्वी कृषिमंत्र्यांनी देखील बैठक घेत लिंकिंग बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र तोडगा निघाला नाही. ‘राज्य सरकारने आदेश दिल्यानंतरदेखील खत कंपन्यांकडून लिंकिंग बंद केले जात नाही. तसेच या कंपन्यांविरोधात कृषी विभाग कारवाई करीत नसल्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच लिंकिंग विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे,’ असे ‘माफदा’ने पत्रात नमूद केले आहे.

खरीप हंगाम तोंडावर आलेला विक्रेते मात्र लिंकिंगच्या समस्येमुळे हैराण झालेले आहेत. आम्ही सर्व पातळ्यांवर ही समस्या मांडली आहे. लिंकिंग बेकायदा असून त्यात हकनाक विक्रेत्याचा बळी दिला जात आहे. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही रासायनिक खत कंपन्यांच्या खरेदीवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.
विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‍स, सीड्‍स डीलर्स असोसिएशन (माफदा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT