Fertilizer Stock 2025 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन लाख टन खतसाठा पुरवठा मंजूर

Kharif Season 2025 : माहितीनुसार,मंजूर करण्यात आलेल्या खतसाठ्यांच्या पुरवठ्यात युरियाचे १ लाख १२ हजार ५२१ टन, डीएपी २५ हजार ७ टन, एमओपी ३६४० टन, संयुक्त खते १ लाख २० हजार टन, एस एस. पी. ४० हजार ३०० टन मंजूर खत पुरवठ्याचा समावेश आहे
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२५ करिता ३ लाख १ हजार ४६८ टन खतसाठ्याचा पुरवठा मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली.

माहितीनुसार,मंजूर करण्यात आलेल्या खतसाठ्यांच्या पुरवठ्यात युरियाचे १ लाख १२ हजार ५२१ टन, डीएपी २५ हजार ७ टन, एमओपी ३६४० टन, संयुक्त खते १ लाख २० हजार टन, एस एस. पी. ४० हजार ३०० टन मंजूर खत पुरवठ्याचा समावेश आहे.

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने मंजूर पुरवठ्यानुसार खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये ११,२५२ टन युरिया, २२५१ टन डीएपी, २५५ टन एमओपी, ६ हजार टन संयुक्त खते, २८२१ टन एस. एस. पी. खत साठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ७००० टन युरिया तर ६०० टन डीएपी खत उपलब्ध झाले आहे.

Fertilizer
Chemical Fertilizer Linking: लिंकिंगशिवाय मिळेनात रासायनिक खते

साडेअठरा लाख कपाशी बियाणे पाकिटांची मागणी

जिल्ह्यासाठी १८ लाख ५० हजार कपाशी बियाणे पाकिटाची मागणी करण्यात आली आहे. मार्चमध्ये कपाशी बियाणे पाकिटाची किंमत वाढली आहे. त्यामुळे आधी ८६४ रुपयांना मिळणारे कपाशी बियाणे पाकिट आता ९०१ रुपयांना मिळणार आहे. मागणीच्या तुलनेत किती बियाणे पाकीट मिळणार हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे.

Fertilizer
Fake Fertilizer : बनावट खतविक्री प्रकरणी हिमायतनगरमध्ये गुन्हा

६८ हजार ६२४ टन खतसाठा शिल्लक

जिल्ह्यात खरीप २०२४-२५ मध्ये ३ लाख ९१हजार १८७ टन खताची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन लाख ८८ हजार ७०० टन खत आवंटनमंजूर कऱण्यात आले होते.३१ मार्च २०२४ अखेर १३८५१६ टन खत साठा शिल्लक होता तर २ लाख १० हजार ३८२ टन खत साठा उपलब्ध झाल्याने एकूण खत साठ्याची उपलब्धता ३ लाख ४८ हजार ८८८ टन इतकी झाली होती.

त्यापैकी २ लाख ८० हजार २६४ टन खताची विक्री झाल्याने ६८६२४ टन खत शिल्लक होते. मार्च २०२५ अखेर युरियाचा ३६ हजार ५०७ टन तर डीएपी खताचा २३३१ टन खत साठा शिल्लक होता.

खत आणि बियाणे आवश्यकता व वेळेच्या आधी मिळावे यासाठी नियोजन सुरू आहे. जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. युरिया व डीएपी खताचा साठासंरक्षित करणे ही सुरू आहे.
- प्रकाश पाटील, जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com