Transport Union Strike  Agrowon
ॲग्रो विशेष

Transport Union Strike : भाज्यांचे दर वाढले, पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा ; वाहतूक संघटनांच्या संपाचा परिणाम

New Motor Vehicle Act : हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारने सुधारणा केल्या आहेत. याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे १ जानेवारीपासून वाहतूक संघटनांनी संप पुकारला आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन कायद्या'विरोधात वाहतूक संघटनांनी संपाची हाक दिली आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून खासगी बससह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता दैनंदीन व्यवहारांवर या संपाचा परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे.

बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारने सुधारणा केल्या आहेत. याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे १ जानेवारीपासून वाहतूक संघटनांनी संप पुकारला आहे.

भाजीपाल्याचे दर वाढले

वाहतूकदारांच्या संपाचा थेट परिणाम भाजीपाल्यांचा दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईमधील बाजार समितीमध्येही या संपाचा परिणाम दिसत आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी घटली आहे. बाजार समितीमध्ये रोज भाजीपाल्याच्या ६०० ते ७०० गाड्यांची आवक होत असते.

गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या सारख्या शेजारील राज्यातून गाड्या कमी आल्या आहेत. मात्र संपामुळे आज केवळ ५०० ते ५२५ गाड्यांची आवक जाली आहे. परिणामी भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पेट्रोल पंपावर रांगा, स्कूल बसही बंद

दरम्यान, वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपात इंधन वाहतूक करणारे टँकर चालकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यतेमुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्याचे दिसत आहे. तसेच अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.

काय आहे सुधारित हिट अँड रन कायदा?

मोटर अपघात कायद्यामध्ये केंद्र सरकारने काही सुधारणा केल्या आहेत. बेदरकारपणे वाहने चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस किंवा प्रशासनाला अपघाताची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे न केल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हिट अँड रन शिक्षेची दोन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे जर अपघात झाला आणि त्याने पोलिसांना अपघाताची माहिती दिली तसेच जखमींची मदत केल्यास दंडासह पाचवर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.

अपघातानंतर कोणालाही न कळवता अपघातस्थळावरून चालक पळून गेल्यास सात लाखांच्या दंडासह १० वर्ष्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद सुधारित करायद्यात करण्यात आली आहे. सध्या या कायद्यामध्ये दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

आधिच्या कायद्यातील तरतूदीनुसार हिट अँड रनचा जामीनपात्र गुन्हा होता. मात्र कायद्यातील सुधारणेनंतर हिट अँड रनचा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. यामुळे जामीन मिळणे कठीण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT