Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या शेतीला कुलगुरूंची भेट

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सातारा ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील (Dr. Prashantkumar Patil) यांनी रविवारी (ता. ५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दरे (ता. महाबळेश्‍वर) येथील शेतासह इतर शेतकऱ्यांच्या शेतास समक्ष पाहणी केली.

शेतीविषयक अडचणी तसेच उपलब्ध साधन सामग्री याविषयी माहिती घेतली. सरपंच रणजित शिंदे, विकास सोसायटीचे सचिव राजेंद्र मोरे यांच्याबरोबर उपस्थित गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतीची सद्यःस्थिती व भविष्यातील होणारे संभाव्य बदल आणि त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) कशा स्वरूपात मार्गदर्शन करू शकते याविषयी चर्चा झाली.

शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी उत्पन्न चांगले मिळते, परंतु उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी कच्च्या मालासाठी स्थानिक पातळीवर बाय प्रॉडक्ट युनिट असावे, अशा समस्या त्यांनी नमूद केल्या.

उत्पादित मालाला योग्य तऱ्हेचे मार्केटिंगचे व्यवस्था निर्माण व्हावी यासारख्या सूचना दिल्या, जंगलातील रेशीम शेती प्रकल्प, उचाट जंगल रेशीम प्रकल्पाची माहिती घेऊन चांगल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे, डोंगर भागात आयुर्वेदिक विविध औषधी वनस्पतींची लागवड करावी, प्रकल्प राबवावेत व नैसर्गिक साधनसामग्रीचा पडणाऱ्या सहा हजार मिलिमीटर पावसाचा कसा योग्य वापर वापर करून कोणती पिके, फळझाडे, औषधी वनस्पती सर्व खरीप, रब्बी, उन्हाळी पिके घेता येतील याबद्दल डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी कांदाटी भागात या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार नवीन उपक्रमाचा जिल्हा बँकेच्या पतपुरवठा धोरणामधे समावेश करून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याबद्दल, तसेच कृषी पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासित केले.

या प्रसंगी निवृत्त मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुभानजी ढाणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर राजेंद्र भिलारे, माजी ऊस विकास अधिकारी नेताजी पवार, कृषी विज्ञान केंद्र बोरगांव येथील शास्त्रज्ञ डॉ. महेश बाबर, भूषण याद्गीरवर, सागर सकटे, संग्राम पाटील, विजय शिंदे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT