Sangli News : ‘‘जिल्ह्यात हळदीचा उद्योग फार मोठा आहे. वसमत (जि. हिंगोली) येथे हळद संशोधन केंद्र सुरू झाले आहे. त्याचे उपकेंद्र सांगलीत सुरू करू, त्यासाठी लवकरच सांगलीत बैठक घेऊ,’’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सांगली येथे सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे (एमसीसीआयए) घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेत मंत्री सामंत बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, नीता केळकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह महाराष्ट्र चेंबर कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘‘वसमत (ता. हिंगोली) येथे १०० कोटी खर्चून हळद संशोधन केंद्र सुरू झाले आहे. महामंडळाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याशी हळद संशोधन केंद्रासंदर्भात आताच बोलणे झाले आहे. त्यांनी सांगलीसाठी हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे हळदीवर अजून चांगल्या प्रकारचे संशोधन होण्यास मदत होईल.’’
ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील जे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने सोडविले जातील. जिल्ह्याच्या उद्योगाला किर्लोस्कर यांनी ताकद दिली. नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगाला सर्वांनी समर्थन करण्याची गरज आहे.
दाओसमध्ये १५७० लाख कोटींचे करार झाले आहेत. राज्यभरामध्ये शाश्वत गुंतवणूक करून उद्योग उभे केले जाणार आहेत. त्यातून दहा ते बारा लाख रोजगार निर्मिती होईल.’’ कापूस हा कोणकोणत्या ठिकाणी वापरला जातो हे मला माहीत नव्हते.
संरक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस वापरला जातो. त्यामुळे संरक्षण विभागाकडून कापसाची हमीभावासह खरेदी करायची असेल ती आम्ही शंभर टक्के करू, अशी मागणी आहे. त्यामुळे आम्ही संरक्षण विभागासाठी अमरावतीमध्ये कॉटन हब करणार आहोत, असे सामंत म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.