Solar Power Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५०० किलोवॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

Solar Energy : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत व महाविद्यालयांच्या छतावर ५०० किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत व महाविद्यालयांच्या छतावर ५०० किलोवॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. मंगळवारी (ता. २५) कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले.

या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, अपारंपरिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके,

विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, ई-ऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी पुर्वांक शहा, प्रशांत तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार आहे. सौर ऊर्जा ही सर्वाधिक स्वच्छ, पुनर्नवीनीकरणीय आणि दीर्घकालीन टिकणारा अक्षय ऊर्जा स्रोत आहे. प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चिक असलेल्या या ऊर्जेचा उपयोग वाढविण्याची गरज आहे.

सौर प्रकल्प उभारणीचे कार्य ठाणे येथील मे. ई ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. भविष्यात ६४० किलोवॉटपर्यंत सौर ऊर्जा क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील पंचवीस वर्षांसाठी दर युनिट ४.९९ रुपये प्रमाणे वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT