Solar Pump Scheme: पैसे भरूनही मिळेना सौरपंप; अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत

Government Scheme Delay: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरले असतानाही त्यांना अजूनही सौरपंप मिळालेले नाहीत. राज्यभरात तब्बल अडीच लाख अर्ज प्रलंबित असून, महावितरणच्या एजन्सींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Solar Pump
Solar PumpAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘मागेल त्याला कृषी सौरपंप’ योजनेच्या लाभासाठी निवड झाल्यानंतर पैसे भरूनही सौरपंप मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरपंप बसवण्यासाठी निश्चित केलेल्या एजन्सीला दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन अर्जदाराला एजन्सी निवडताना अडचणी येत आहे. सौर कृषिपंपासाठी पैसे भरूनही सध्या अहिल्यानगरसह राज्यात मिळून अडीच लाखांच्या जवळपास अर्ज प्रलंबित आहेत.

विजेचा प्रश्न सुटावा यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना राबवली जात आहे. पूर्वी शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना होती. तीच आता ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना झाली आहे. योजनेतून लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स, कृषिपंप असा संच मिळतो.

Solar Pump
Solar Pump Scheme : सात महिने लोटूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतिक्षा

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होते, शिवाय सलग पंचवीस वर्षे यातून वीजनिर्मितीची क्षमता असल्याने शेतकऱ्यांकडून सौर कृषिपंपासाठी अधिक मागणी आहे. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज केल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून शेतकरी वाटा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मेसेज येतात. शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर पैसे केल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून मान्यता दिली जाते.

त्यानंतर पुन्हा त्या-त्या भागातील वायरमनकडून आयडी तयार करून दिला जातो. शेतकऱ्यांची निवड करून सौरपंप पुरविणाऱ्या कंपन्यांना कळविले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्चपर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करून दिली आहेत. महावितरणकडून त्यामध्ये ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’चा समावेश करण्यात आला. राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांमध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’चा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र पैसे भरूनही पंप मिळत नसल्याचे राज्यभरातील चित्र आहे.

Solar Pump
Solar Pump Scheme : सौर कृषिपंप योजनेसाठी आर्थिक मागणीस बळी पडू नये

या योजनेसाठी महावितरणकडून निश्‍चित करण्यात आलेल्या एजन्सीने यापूर्वी दिलेले उद्दिष्ट (कोटा) पूर्ण केल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. एकदा अर्ज केला व पैसे भरले की नवीन एजन्सी निवडता येत नाही. त्याचा फटकाही शेतकऱ्‍यांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीस कंपन्यांकडून पूर्वी दिलेले सौरपंप बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.

त्यामुळे महावितरणने त्यांना काम दिले नाही, त्या व्यतिरिक्त पंधरा नवीन कंपन्या आहेत. मात्र त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या पैसे भरूनही सौरपंप मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या अडीच लाखांच्या जवळपास आहे. आता पैसे भरूनही सौर कृषिपंप मिळत नसल्याने शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी आपण कृषी सौरपंपासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करून त्याची रक्कमही भरली आहे. परंतु अद्याप सौर कृषिपंप बसवला नाही. कंपनीची नावे निवडण्याचा पर्याय खुला नसल्याने पैसे भरूनही पंप मिळत नाही. रब्बीचे पीक सध्या वाया जात असून, शासनाने रब्बी पिकाला उपयोग होईल अशा रीतीने सौर कृषिपंप उपलब्ध करून द्यावेत.
शेषराव आपशेटे, शेतकरी, शहरटाकळी ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com