Vasantdada Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Vasantdada Sugar Factory : ‘वसाका’ची कोट्यवधींची मालमत्ता धूळ खात

Team Agrowon

Nashik News : सहकाराच्या माध्यमातून एका काळी नावारूपास आलेली करोडो रुपयांची मालमत्ता असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षापासून बंद आहे. आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि पूर्ण कारखाना अशी आजमितीला ५०० कोटींची मालमत्ता धूळ खात आहे.

कारखाना परिसरात प्रकाशयोजना नसल्याने जंगली श्‍वापदे, माकडे व इतर जनावरांचा अधिवास वाढला आहे. अशा परिस्थितीत केवळ तीन सुरक्षा कर्मचारी कारखान्याच्या सुरक्षेसाठी उभे असतात. त्यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिखर बँकने थकित कर्जाच्या वसुलीसाठी वसाका कारखान्यांची मालमत्ता जप्त केली आहे. परंतु, या कारखान्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षायंत्रणा तैनात नसल्याचे चित्र आहे. तीन युनिट्स व इतर यंत्रणा सांभाळायला एका शिफ्टसाठी फक्त तीनच सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. त्यांच्याजवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठीही पुरेशी सुरक्षायंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ते कारखान्याची सुरक्षा कशी पार पाडणार हा प्रश्‍न आहे.

कारखान्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकी कोणाची नियुक्ती केलेली आहे, सध्या वसाकाचे अवसायक कोण आहेत, हेच सभासदांना माहिती नाही. सुरक्षा कर्मचारी प्रामाणिकपणे प्रवेशद्वाराची राखण करतात. मात्र त्यांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. कारखान्याच्या आसवनी प्रकल्पात बिबटे तसेच माकडे फिरताना दिसतात. कसमादेचे वैभव असलेला हा वसाका असा बंद न ठेवता तो चालू व्हावा, त्याची चाके फिरती असावीत, अशी मागणी आहे. 

या वर्षी धाराशिव प्रशासनाने कारखाना सुरू करण्यासाठी असमर्थता दर्शविली. आता अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे कारखाना परिसरात वाळूची तस्करी व अवैध धंदे सुरू आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातील १७ मेगावॉट क्षमतेच्या जनित्रामधून ऑइलचोरी झाल्याचे उघडकीस झाले होते. त्यासाठी चोरट्यांनी जनित्राच्या आउटलेटसाठी वापरला जाणारा पाइप १०० मीटर दूरवर नेऊन संरक्षक भिंतीला भगदाड पाडून चोरी केली होती.

वसाका २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. मात्र कारखाना जेमतेम तीन-चार वर्षे तोही कधी चालू, तर कधी बंद असा चालवला. त्यामुळे कामगारांनाही त्यांच्या हक्काचे पगार व शासकीय भरणा केला नाही. कामगार संघटनेशी झालेल्या कराराचे उल्लंघन करून ते वसाका सोडून गेले.
कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
२८ हजार सभासद असलेल्या वसाकाची करोडोंची मालमत्ता धूळ खात आहे. येथील सुरक्षायंत्रणा कोलमडली आहे. पुन्हा एकदा कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारावा.
रामकृष्ण जाधव, ऊस उत्पादक, भादवण
वसाका बंद अवस्थेत असल्याने कारखान्याची वाताहत होत आहे. कामगारांची मागील देणी अद्याप मिळालेली नाहीत. पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने कारखान्याचे भवितव्य धोक्यात आहे.
विलास सोनवणे, अध्यक्ष, मजदूर युनियन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT