Sugar Smuggling : भारत-बांगलादेश सीमेवर साखरेची तस्करी रोखली : १२० क्विंटल साखर जप्‍त

Sugar Export : देशातून साखरेची निर्यात बंद असतानाही साखरेची बांगलादेशात तस्‍करी होत असल्याचे सामोरे आले आहे. बीएसफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीपात्रात साखरेच्‍या पोत्‍यांनी भरलेली बोट जप्‍त केली आहे
Sugar Smuggling
Sugar SmugglingAgrowon

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar News : कोल्हापूर ः
देशातून साखरेची निर्यात बंद असतानाही साखरेची बांगलादेशात तस्‍करी होत असल्याचे सामोरे आले आहे. बीएसफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीपात्रात साखरेच्‍या पोत्‍यांनी भरलेली बोट जप्‍त केली आहे.

१२० क्विंटल एवढी साखर जप्त करण्यात आली असून, ती सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. बीएसएफ गुवाहाटीने ट्विट करून ही माहिती दिली. एकीकडे सरकारने निर्यातीवर निर्बंध आणले खरे, पण तस्‍करीचे प्रकार उघडकीस येत आहेत. १ डिसेंबरपासून ११ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत तिसऱ्यांदा होणारा हा तस्करीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला आहे.

केंद्राने गेल्‍या नोव्हेंबरमध्ये ६० लाख टन निर्यातीला परवानगी दिली होती. ही निर्यात सप्टेंबर मध्यापर्यंत करण्याची मुदत दिली होती. परंतु गेल्‍या हंगामात साखर उत्पादन कमी झाल्याने केंद्राने निर्यातीला वाढीव परवानगी दिली नाही. यामुळे गेल्या चार महिन्यांत भारतातून साखर निर्यात पूर्णपणे बंद आहे.

साखर उद्योगाने सातत्‍याने मागणी करूनही केंद्राने वाढीव निर्यातीला परवानगी दिली नाही. गेल्या काही वर्षांपासून भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान या जवळच्‍या देशांमध्‍ये भारतीय साखरेला चांगली मागणी होती. पण भारतातून साखर जायची बंद झाली आणि या देशांमध्ये साखरेची चणचण निर्माण झाली.

या परिस्‍थितीचा फायदा घेऊन तस्‍करांनी साखरेची तस्करी करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज आहे. ही साखर कोठून आली, तस्‍करीमागे कोण आहे याबाबतची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

देशात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध व्हावी यासाठी इथेनॉल निर्मितीवर बंधने आणली. अशा उपाययोजना करत असताना चोरट्या मार्गाने होणारी साखरेची वाहतूक रोखणे आता केंद्राला आव्‍हानात्मक ठरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com