Vanrai Bandhara Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Erosion : वनराई बंधारे रोखतायेत सातपुड्याची धूप!

Vanrai Bunds : जलसाक्षरता समितीने स्थानिक भूस्थिती व माती व पाणी वाहून जाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची माळच उभी केली आहे. या चळवळीतून १०० पेक्षा अधिक वनराई बंधाऱ्यांचा लाभ २२५ एकरांवरील शेतीक्षेत्रास होत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Satpura Conservation : सातपुडा हा डोंगराळ प्रदेश वृक्षवल्लीने समृद्ध आहे. मात्र, दरवर्षी पावसाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीमुळे येथील जैवविविधताच धोक्यात येत. केवळ वनातील वृक्षवल्लीच नाही, तर आपल्या पारंपरिक वाण संवर्धनांवर माती वाहून जाण्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे डॉ. एच. एम. पाटील यांच्या लक्षात आले. २०१९ पासून सातपुड्यातील अक्राणी तालुक्यातील काकडदा, कुकलट, निमझरी पाडा, मांडवी खुर्द, रोषमाळ बुद्रुक या गावांत त्यांनी जलसंवर्धनाचे कार्य सुरू केले. वाहते पाणी व माती अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याची मोहीमच राबवली. आतापर्यंत सुमारे १०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.

ग्रामस्थांसह परिसरातील युवक, जलसाक्षरता समिती, शेतकरी, शहादा येथील जायंट्स समूह यांनी कामाला हातभार लावला. त्यात ॲड. संगीता पाटील, भूषण बाविस्कर, दीपाली बाविस्कर, माजी वनपाल आर. डी. पाटील, जितेंद्र पावरा, भरत पावरा, पानसिंह रहासे, सुनील परमार, खंडू पावरा, अनिल शिंदे, डॉ. हरिभाऊ पवार, लालसिंग वळवी यांची मोठी मदत होत आहे. या कामांचा लाभ २२५ एकरांवरील शेतीक्षेत्रास नियमितपणे होत आहे. त्यामुळे मातीची धूप थांबली आणि गावातील लोकांना व त्यांच्या पशुधनासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले.

नियमित दुरुस्ती, देखभाल...

दरवर्षी सातपुडा परिसरातील १५ गावांत किमान १५ बंधारे उभारले जातात. त्याचे फायदे दिसल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ पुढे येऊ लागले. नव्या बंधाऱ्यांच्या बांधकामासोबतच जुन्या बंधाऱ्यांची देखभाल- दुरुस्तींसाठी त्यांची धडपड सुरू झाली. दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ही सर्व कामे पार पाडली जातात. या काळात येणाऱ्या दिवाळीच्या सुट्ट्या, रविवारी परिसरातील विद्यार्थी, युवक शासकीय कर्मचारी, शहरी मंडळीही योगदान देतात. यासाठी आवश्यक प्लॅस्टिकच्या गोण्या व अन्य सामग्री जलसाक्षरता समिती उपलब्ध करून देते.

मदतीला आले संस्थांचे जाळे...

पारंपरिक वाण संवर्धनासह जैवविविधता, जलसंवर्धनासाठी बाएफ, कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्र, जनार्थ संस्था, कृषी विभाग, वन विभाग, उमेद अभियान आणि विविध ग्रामपंचायती अशा शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांचे जाळे तयार झाले आहे. प्रत्येक कामांमध्ये या सर्व संस्था, समूह माहितीचे आदानप्रदान, परस्पर सहकार्य करतात.

पारंपरिक बियाण्यांचे फायदे व उपयुक्तता यांची माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २०१४ पासून धडगाव येथे दरवर्षी पारंपरिक बियाण्याचे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्यात १५५ पारंपरिक वाणांची ओळख करून देण्यात येते. महाविद्यालयातील विद्यार्थी, युवकांच्या सहकार्यातून पाच बियाणे बँका स्थापन झाल्या आहेत. याचा फायदा शेतकरी, ग्रामस्थांसह अभ्यासकांनाही होत आहे.

पारंपरिक बियाणे जतन करताना ज्वारीच्या १८ विविध वाणांची ओळख पटविण्यात आली. त्यांच्या संवर्धनासह एकूणच सातपुड्यातील जैवविविधता, शेतीचे जतन व्हावे यासाठी जमिनीची धूप रोखण्यासाठी व पाणी अडविण्यासाठी धडगाव परिसरातील गावे, ग्रामपंचायती, सरपंच, युवक यांच्या सहकार्यातून वनराई बंधारे साकारण्यात येत आहेत.
डॉ. एच. एम. पाटील ९४०४८८१५४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT