Vanrai Bandhara : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ३२० बंधारे बांधून पूर्ण

जिल्ह्यात पाणीटंचाईची त्रीवता भासू नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्यात वनराई, कच्चे बंधारे बांधत आहे.
Vanrai Bandhara
Vanrai BandharaAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा प्रशासनाने (District Administration) उद्दिष्ट ठेवलेल्या ६ हजार २०० पैकी आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ३२० कच्चे व वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.

उद्दिष्टाच्या ३७.४२ टक्केच बंधारे झाल्यामुळे उर्वरित बंधारे (Bandhara) बांधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात पाणीटंचाईची (Water Issue) त्रीवता भासू नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्यात वनराई, कच्चे बंधारे बांधत आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, विविध कार्यालये, सामाजिक संस्थांद्वारे हे बंधारे बांधतात. त्याचा चांगला परिणाम जाणवत असल्याने दरवर्षी बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावर्षी जिल्ह्यात ६ हजार २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २ हजार ३२० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.

कुडाळ तालुका वगळता एकही तालुका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू शकलेला नाही. कुडाळ तालुक्याला १ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट होते.

Vanrai Bandhara
Water Bunds : कुडाळात एका दिवसात बांधणार १ हजार बंधारे

परंतु प्रत्यक्षात या तालुक्यात १०५० बंधारे बांधण्यात आले आहेत. उर्वरित तालुक्यांत मात्र बंधारे बांधण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे. कणकवलीत १७६, दोडामार्गमध्ये २०, वेंगुर्लेत ८३, मालवणमध्ये २२०, देवगडमध्ये ४४३, सावंतवाडीत १५८ आणि वैभववाडीत १७० बंधारे बांधण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com