Government Funding: २०२६ च्या मार्चअखेर नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बंपर लॉटरी लागली आहे. मतदारसंघात विविध विकासकामांसाठी १७१ कोटी ४० लाखांचा निधी शासनाकडून मिळाला आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांना ८५ कोटी ७० लाख रुपये तर पंचायत समिती सदस्यांना ८५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी येणाऱ्या वर्षभरात मिळणार आहे. मागील चार वर्षे प्रशासक असल्याने हा निधी रखडला होता..जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगामधून २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीतील रखडलेला निधी प्राप्त झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. .Solapur Development Fund: ‘झेडपी’, पंचायत समिती सदस्यांना २९.२२ कोटीचा निधी.ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद स्तरासाठी तब्बल ८५ कोटी ७० लाख तर पंचायत समितीसाठीही ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, तसेच विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. .Irrigation Project Issues: उजनी धरणावरील सात योजना अपूर्णच.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. .तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांनी या निधीमुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.