Sugar Mills Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mills Election : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भावाची एकी?

Sugar Factory Election : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Team Agrowon

Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूकीत मुंडे बहीण-भावाची एकीच्या चर्चा सुरू आहेत.

परळी तालुक्यातील पांगरी वैद्यनाथ सहकारी साखर करखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागेच्या निवडणुकीसाठी १६ मे रोजी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल केला नाही. १६ मेपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

पंकजा मुंडे व धनंजय मुंडे याच्यात वैद्यनाथ कारखान्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी रस्सीखेच सुरू असते. परंतु धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल न केला नाही. धनंजय मुंडे गटाचे वाल्मीक कराड, बीड जिल्हा परिषदेचे माजी गट नेते अजय मुंडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

११ जून रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकपदासाठी मतदान होणार आहे. १ जूनपर्यंत अर्ज घेण्याची तारीख आहे. त्यामुळे मुंडे बहीण-भावाची एकी या निमित्ताने परळी मतदारसंघात पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे.

अलीकडेच श्री क्षेत्र भगवान गडावर आयोजित नारळी सप्ताहात धनंजय मुंडे आणि पांकजा मुंडे एकाच व्यासपीठांवर होते. तसेच आमचं एकमेकांचे व्यक्तिगत विरोधक नाहीत. काही लोकांनी आमच्यात कलह निर्माण केला. आम्ही एकत्र येऊ नये. म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

धनंजय मुंडे यांनीही त्यावेळी पंकजा यांच्या मताशी सहमती दर्शवली होती. त्यातच वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे बहीण-भाऊ एकी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT