Animal Vaccination agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination : ‘पशुवैद्यकीय’ कडून ७०० पशुंचे लसीकरण, पूरग्रस्त भागाचा प्रामुख्याने समावेश

Flood Affected Areas Animal : इचलकरंजी पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Rain Season Vaccination Animal : पावसाळ्यात जनावरांना आजारापासून रोखण्यासाठी लसिकरणाची प्रामुख्याने गरज असते. सध्या घटसर्प, फऱ्याचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच लक्ष न दिल्यास जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळावे, यासाठी इचलकरंजी पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. यामधून सुमारे ७०० जनावारांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान इचलकरंजी परिसराला पुराचा वेढा बसतो यासाठी पूरग्रस्त भागातील जनावरांना प्राधान्याने लस टोचली दिली जात आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी सत्यदीप चिकबिरे म्हणाले की, पावसाळ्यामध्ये पशुपालकांनी जनावरांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ पशु दवाखान्यामध्ये दाखवावे. ज्यामुळे वेळीच उपचार करणे शक्य होईल. इचलकरंजी शहर परिसरात सुमारे १० हजारांहून अधिक जनावरांची संख्या आहे. यामधील गायी, म्हैस, बैल असणारे बहुतांश पशुपालक पूरग्रस्त भागातील रहिवासी आहेत. त्यामुळे तेथील जनावरांना घटसर्प व फऱ्‍या रोगांचे लसीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं.

इचलकरंजी पशुवैद्यकीय विभागाने मे व जूनमध्ये ५५० घटसर्प, ६० फऱ्या, तर दोन्ही एकत्रित असलेल्यांना ९० टक्के असे लसीकरण केले आहे. त्यामुळे ही जनावारे साथीच्या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे.

वातावरण बदलाचा जनावरांवर परिणाम

-पावसाळी वातावरण रोग पसरवणाऱ्‍या जिवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल

-पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प व फऱ्‍या रोगाचा प्रादुर्भाव

-पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी घटसर्प व फऱ्या रोगाचे प्रमाण अधिक

-जनावारे बांधण्याचे ठिकाण अस्वच्छ, रोगप्रतिकार क्षमता कमी असलेली जनावरे आजारास जलद बळी

-संसर्ग झालेल्या जनावरांवर वेळीच उपाय न झाल्यास जनावरे दगावण्याचाही धोका

घटसर्पाची लक्षणे

तीव्र ताप, डोळे लाल आणि सुजलेले दिसतात. नाक, डोळे आणि तोंडातून स्त्राव होतो. मान, डोके किंवा पुढील पायांच्या दरम्यान सूज येणे, श्‍वास घेताना पुटपुटण्याचा आवाज येणे.

फऱ्‍याची लक्षणे

रोगी जनावरास ताप येणे, जनावराच्या मांसल भागावर विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूजेच्या ठिकाणी दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सुजलेला भाग काळा दिसतो. जनावर हळूहळू काळवंडते.

२०१९ च्या नोंदणीनुसार पशूंची संख्या

नोंदीत जनावरे इचलकरंजी शहरात गाय, म्हैस आणि शेळी मिळून ४१०३ जनावरे आहेत तर कबनूरमध्ये ९३८, तर चंदूरमध्ये २२६५ जनावरे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT