Pune News: गेल्या काही महिन्यांपासून पशुधनामध्ये पसरलेली लम्पी स्कीन आजाराची साथ नियंत्रणात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला असला तरी राज्यात वेगाने पुन्हा एकदा हा आजार पसरत असल्याचे चित्र आहे. .पशुसंवर्धन विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २९ हजार ८४६ पशुधन बाधित असून, यामध्ये १ हजार ५० पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र यापेक्षा अधिक पशुधन बाधित असल्याच्या तक्रारी पशुपालक करत आहेत. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर देण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे..राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील पशुधन लम्पी स्कीन प्रादुर्भावामुळे पशुधन बेजार झाले आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाने लसीकरण केल्यामुळे लम्पी आटोक्यात असल्याचा दावा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये २०० पेक्षा अधिक पशुधन मृत झाल्याने पशुसंवर्धन विभागाचा लसीकरणाचा दावा फोल ठरला आहे. अहिल्यानगरमध्ये १७१, लातूरमध्ये १४९, सातारा जिल्ह्यात १०५ अशा सर्वाधिक पशुधन मृत्यूच्या घटनांची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे..Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा.छत्रपती संभाजीनगरमध्ये ८६ पशुधन दगावलेजिल्ह्यात तब्बल २ हजार ४० पशुधनाला लम्पीची बाधा झाली होती. त्यापैकी १६५७ पशुधन बरे झाले, तर ८६ पशुधनाला जीव गमवावा लागला. पशुसंवर्धन विभागाच्या १० नोव्हेंबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २९७ पशुधनाला लम्पीची बाधा झाली असून त्यामध्ये ११६ अल्प, तर ११४ पशुधनाला मध्यम प्रमाणात बाधा झाली आहे. तर तीव्र लक्षणामुळे सुमारे ६७ पशुधनावर अजूनही उपचार सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले..जालना जिल्ह्यात ६७ दगावलेजालना जिल्ह्यात ६७ पशुधनाचा लम्पीमुळे दगावले आहेत. जिल्ह्यात प्रादुर्भाव झालेल्या पशुधनाची संख्या १ हजार ३२० इतकी आहे. सध्या सुमारे ४५ पशुधनाची बाधित म्हणून नोंद झाली आहेत. या वेळी वासरे व लहान जनावरांवर प्रादुर्भाव जास्त होता. जिल्ह्यातील भोकरदन, जालना व बदनापूर तालुक्यांत प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून आला..बीड जिल्ह्यात ५८ दगावलीबीड जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, आजपर्यंत बाधित पशुधन ९०३ इतके आहे. तर उपचाराने बरे झालेल्या पशुधनाची संख्या ६४२ इतकी आहे. जवळपास ५८ जनावरे दगावली आहेत. सध्या उपचाराधीन पशुधन संख्या २०३ इतकी आहे..Lumpy Skin Disease: लंम्पी त्वचा आजार बाधित गोवंशाचे व्यवस्थापन.संगमेश्वर येथे फैलावसंगमेश्वर (जि. रत्नागिरी) भागात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याची तक्रार पशुपालक करत आहे. शिवणे, कसबा आणि आसपासच्या गावांमध्ये या आजाराचा प्रसार झाला आहे. शिवणे येथील शेतकरी राजेश शिंदे यांच्या वासराचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम सुरू केली आहे. तथापि, आजाराचा प्रसार जलदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे. तसेच भटक्या जनावरांना देखील आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्वच्छता राखणे, संक्रमित पशुधनाला वेगळे ठेवणे आणि लसीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले..पशुसंवर्धन विभागाचे आवाहन लम्पी स्कीन या आजाराचे नियंत्रण करण्याकरिता आपला गोठा स्वच्छ ठेवावा. बाधित पशुधनाला वेगळे ठेवण्यात येऊन त्यावर तातडीने उपचार सुरू करावेत. सायंकाळी लिंबाच्या पाल्याचा धूर करावा, जेणेकरून डास, माशा यांच्यापासून पशुधनाचा बचाव करता येईल. गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करून घ्यावी. पशुधनावर ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी. पशुधन आजारी पडल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कळवून उपचार करून घ्यावेत..‘लम्पी स्कीन’मुळे बाधित पशुधनाच्या नोंदी पशुसंवर्धन विभागाद्वारे घेतल्या जात आहेत. ज्या ठिकाणी लम्पीची बाधा झालेले पशुधन आढळेल, त्या गावचा १० किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जात आहे. तसेच त्या परिसरातील सर्व पशुधनाला तातडीने लसीकरणाच्या सूचना सर्व जिल्हा आणि तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आजारी पशुधनावर तातडीने उपचार करण्याच्या देखील सूचना केल्या आहेत.डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.