Fisheries Agrowon
ॲग्रो विशेष

Fisherman Needs Shipyard : उत्तनच्या मच्छीमारांना हवे अद्ययावत शिपयार्ड

उत्तन येथील मच्छीमारांना एका अद्ययावत शिपयार्डची आवश्यकता भासत आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असताना इंजिन दुरुस्ती, नौकांची रंगरंगोटी, जाळी विणणे अशा विविध कामांसाठी येथील मच्छीमारांना अन्य ठिकाणी जावे लागते.

Team Agrowon

Bhainder Fisherman News : उत्तन येथील मच्छीमारांना एका अद्ययावत शिपयार्डची (Shipyard) आवश्यकता भासत आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असताना इंजिन दुरुस्ती, नौकांची रंगरंगोटी, जाळी विणणे अशा विविध कामांसाठी येथील मच्छीमारांना अन्य ठिकाणी जावे लागते.

त्यामुळे उत्तनमध्येच असलेल्या भाटेबंदर परिसरातील बोरणे बंदर येथे सुसज्ज शिपयार्ड बांधावे, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

उत्तनमध्ये जवळपास आठशे मासेमारी नौका आहेत. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असताना नौका उभ्या करण्यासाठी उत्तन किनारी सुरक्षित जागा नसल्यामुळे मच्छीमारांना आपल्या नौका चौक, गोराई, मनोरी आदी भागांत न्याव्या लागतात.

मात्र तेथे नौकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे नौका उभ्या करण्यावरूनही वाद होत असतात. मासेमारी व्यवसाय बंद असल्यामुळे मच्छीमार आपल्या नौकांच्या इंजिनची देखभाल-दुरुस्ती, नौकांची रंगरंगोटी, तुटलेल्या जाळ्या विणणे, तसेच नवीन जाळी बांधणे आदी कामे हाती घेतात.

मात्र त्यासाठीही उत्तनमध्ये योग्य जागा नसल्यामुळे त्यांना अन्य ठिकाणी जावे लागते. या काळात नौकांमधील विविध प्रकारचे सामान उतरवून गोदामांमध्ये ठेवावे लागते.

मात्र त्यासाठी खासगी गोदामे त्यांना भाड्याने घ्यावी लागतात. यासाठी उत्तनमध्ये सुसज्ज शिपयार्ड झाले तर मच्छीमारांचा मोठा त्रास वाचणार आहे.

वेलंकनी चर्च भाटेबंदर येथील बोरणे बंदर ही जागा या शिपयार्डसाठी अतिशय योग्य असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. याठिकाणी किनाऱ्‍याला खडक असल्यामुळे समुद्राच्या लाटांचा माराही कमी आहे.

या भागात अनधिकृत हॉटेल मालक कब्जा करत आहेत. शिपयार्ड झाले तर येथील जागाही सुरक्षित राहतील, असे मच्छीमारांना वाटत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

Totapuri Mango: तोतापुरी आंब्याला १५ हजारांचा दर

Rahul Gandhi Demands: धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Petrol Ethanol Blending: इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित

SCROLL FOR NEXT