Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Mahanand Mane: कृषिमंत्र्यांविषयी ‘घुसखोरी’ शब्दप्रयोग चुकीचाः डॉ. माने

Agriculture Minister Office Controversy: पुणे कृषी महाविद्यालयातील शताब्दी इमारतीत कृषिमंत्री कार्यालय सुरू करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘घुसखोरी’ असा उल्लेख चुकीचा असून कृषिमंत्री हे कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती असल्याने कार्यालय आवश्यकच आहे, असा खुलासा प्राचार्य डॉ. महानंद माने यांनी केला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: ‘‘कृषिमंत्री हे कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती आहेत व शेतकरी वर्गाशी संबंधित कृषी महाविद्यालयेही त्यांच्या कामाशीच निगडित असल्यामुळे त्यांच्या बाबत ‘घुसखोरी’ असा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. तसेच शताब्दी इमारतीतील रिकाम्या खोल्यांमध्ये नवीन बांधकाम न करता थोडीफार दुरुस्ती व नूतनीकरण करून कृषिमंत्री कार्यालय सुरू करता येईल,’’ असा खुलासा पुणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी केला आहे.

‘अॅग्रोवन’मध्ये गुरुवारी (ता. २०) ‘पुण्यातील शताब्दी इमारतीत कृषिमंत्री कार्यालयाची घुसखोरी’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यासंदर्भात डॉ. माने यांनी लेखी खुलासा पाठवला आहे. त्यामध्ये डॉ. माने यांनी म्हटले आहे, की कृषिमंत्री हे कृषी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष व चार कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती आहेत. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक वर्षापासून पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारात बंगला उपलब्ध आहे.

तत्कालीन व सध्याचे कृषिमंत्री पुणे दौऱ्यावर असताना बंगल्यावर येतात. कृषिमंत्री येथे आले असता, गाठीभेटी व बैठकांसाठी येणाऱ्या अधिकारी वर्गामध्ये महिला अधिकारी, कर्मचारीही असतात. त्यामुळे त्यांना बंगल्यावर न भेटता एक छोटे कार्यालय जवळ असणे सयुक्तिक होते. बैठकांसाठी या ठिकाणापासून जवळ महाविद्यालयात कार्यालय असावे असे कृषिमंत्री यांनी जानेवारी महिन्यातील महाविद्यालय भेटीमध्ये सुचविले होते.’’

तसेच शताब्दी इमारतीत आपले दालन नसून ते जुन्या मुख्य इमारतीत आहे. तसेच हवामान अद्ययावत संशोधन केंद्राचा फक्त फलकच या इमारतीतील तळमजल्यावर असून हा प्रकल्प संपलेला आहे. नवीन इमारतीमधील रिकाम्या खोल्यांमध्ये तात्पुरत्या मृद चाचणीसाठीच्या पिशव्या ठेवण्यात आलेल्या होत्या, असे डॉ. माने यांनी कळविले आहे.

‘‘शताब्दी इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे काही खोल्या रिकाम्या होत्या. तेथे थोडीफार दुरुस्ती करून कार्यालय सुरू करता येईल. कार्यालय सुरू झाल्यास आपोआप त्या मजल्यावर निगा, टापटीप राखली जाईल व कालांतराने त्याचा वापर महाविद्यालयालाच होणार असल्याने या ठिकाणी कोणतेही नवीन बांधकाम न करता दुरुस्ती व नूतनीकरण करून भविष्यामध्ये कार्यालय रीतसर सुरू करता येईल,’’ असे डॉ. माने यांनी नमूद केले आहे.

कृषी महाविद्यालयात सर्व ठिकाणी सध्या अग्निशमन यंत्रणेचे काम चालू आहे. नवीन शताब्दी इमारतीमध्ये सुद्धा अग्निशमन यंत्रणेचे काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर फॉल सिलिंगचे काम करावयाचे झाल्यास केलेले अग्निशमन यंत्रणेचे काम पुन्हा करावे लागले असते. म्हणून छत दुरुस्तीचे व विद्युतीकरणाचे काम चालू होते. हे दुरुस्तीचे काम सध्या थांबविण्यात आले आहे.
डॉ. महानंद माने, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: संपूर्ण कर्ज माफ करा: अजित नवले

Maharashtra Budget 2026: विकासाचे मृगजळ

Revenue Camp: बारामतीत ‘महसूल समाधान शिबिर’ अभियानास आजपासून प्रारंभ

Farm Loan Controversy: शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी

Dimbhe Dam: डिंभे धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT