Agriculture Minister Office: महाविद्यालयात कृषिमंत्र्यांच्या कार्यालयास विरोध

Pune Agricultural College Protest: पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींना विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम होईल, असा आक्षेप घेतला जात असून या प्रकरणी मोठा गदारोळ सुरू आहे.
Pune Agriculture College
Pune Agriculture CollegeAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे कृषी महाविद्यालयातील शताब्दी इमारतीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय थाटण्यासाठी सुरू असलेल्या तयारीची बातमी ‘अॅग्रोवन’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शैक्षणिक व राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि विरोधी पक्षातील राजकीय मंडळींनी हे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी या प्रकरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक वास्तूत कृषिमंत्री कार्यालय नको, असे सांगतानाच कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय आधीच झालेला असेल तर तो पाळावा लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Pune Agriculture College
Agriculture Universities : कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे नव्या जबाबदाऱ्या

डॉ. गडाख म्हणाले, की कृषिमंत्री कार्यालयासाठी जागा देण्यासंदर्भात यापूर्वी काय निर्णय झाले याची मला माहिती नाही. वास्तविक पाहता महाविद्यालयाच्या आवारात असे कार्यालय नको आहे. त्यासंबंधात सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल. तसेच कृषी विद्यापीठाकडे काही माहिती असेल तर ती पाहून सांगतो.

पुणे कृषी महाविद्यालय माजी कृषी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक पवार यांनी महाविद्यालयाच्या आवारात कृषिमंत्री कार्यालय सुरू करण्यास विरोध दर्शविला. ते म्हणाले, ‘‘सरकार सत्तेत येऊन तीन महिने झाले. या कार्यकाळात ठोस कामे झालेली नाहीत. आता जे कृषी खात्याचे मंत्री झाले आहेत, त्यांचेही वाद पुढे येऊ लागले आहे. ते त्या वैयक्तिक कामांत एवढे गुंतले आहेत, की त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांकडे पाहायला वेळच नाही. यासंदर्भात आमच्या पक्षातील वरिष्ठांना लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.’’

दरम्यान, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात कृषिमंत्री कार्यालय सुरू करू नये, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. कृषिमंत्र्यांच्या नियोजित कार्यालयामुळे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा महाविद्यालयात वावर वाढेल व त्यामुळे शैक्षणिक कामकाज विस्कळीत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालय सुरू झाल्यास पार्किगसारखे अनेक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात.

Pune Agriculture College
Drip Irrigation Subsidy : ठिबकच्या थकीत अनुदानासाठी जिल्हा कृषी कार्यालयास ठोकले टाळे

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, यासाठी लवकरच निवेदन दिले जाईल, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

शताब्दी इमारतीतील कामास स्थगिती

पुणे कृषी महाविद्यालयातील शताब्दी इमारतीत सुरू असलेल्या कामास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे काम बंद राहणार असले, तरी झालेल्या खर्चाचे काय करायचे किंवा हा खर्च शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कामास एवढा विरोध कशासाठी केला जात आहे, हे कळत नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com