Parbhani News : तापमानातील वाढ, वेगाने होणारे बाष्पीभवन, बेसुमार उपसा आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील २२ पैकी १४ लघू सिंचन प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यापैकी ३ लघू तलाव कोरडे पडले आहेत.
उर्वरित ८ लघू तलावांमध्ये सरासरी ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठा संपलेल्या तलावांवर अवलंबून गावात पाणी टंचाई उद्भवली आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा हे ३ लघू तलाव कोरडे पडले आहेत. उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळगाव (ता. गंगाखेड), कोद्री (ता. गंगाखेड), देवगाव (ता. जिंतूर), चिंचोली (ता. जिंतूर), आडगाव (ता. जिंतूर), केहाळ (ता. जिंतूर), मांडवा (ता. जिंतूर), दहेगाव या ११ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
उर्वरित लघू तलावांमध्ये सरासरी ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यात जिंतूर तालुक्यातील वडाळी येथील तलावात ५ टक्के, कवड येथील तलावात ४ टक्के, भोसी येथील तलावात १७ टक्के, पाडाळी येथील तलावात १२ टक्के पाणीसाठा होता.
पाथरी तालुक्यातील झरी तलावात ६८ टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील तलावात १७ टक्के, राणीसावरगााव येथील तलावात ४० टक्के, पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील तलावाात २५ टक्के पाणीसाठा होता.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील लघू प्रकल्पात सरासरी ५.२१९ दलघमी पाणीसाठा होता. त्यात घट होऊन गुरुवारी (ता. ८) सरासरी ५.१९६ दलघमी (८ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघूतलावांत सरासरी ८.४६० दलघमी (२० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पात सरासरी २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
त्यात करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पांमध्ये २३ टक्के तर मासोळी (ता. गंगाखेड) येथील मध्यम प्रकल्पात २७ टक्के उपयुक्त साठा होता. गतवर्षी याच तारखेला मध्यम प्रकल्पात सरासरी १८ टक्के पाणीसाठा होता. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याचे दिवसा तापमान ४० अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.