Agriculture Officer Manoj Kumar Dhage Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticide Advisory : कीडनाशकांचा वापर काळजीपूर्वक करा : ढगे

Manoj Kumar Dhage : शेतकऱ्यांनी कीडनाशकांचा वापर योग्य पद्धतीने करावा,’’ असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केला.

Team Agrowon

Buldhana News : ‘‘शेतकऱ्यांनी कीडनाशकांचा वापर करताना विविध बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. खबरदारीच्या उपाययोजना पाळल्या तर विषबाधेसारखे प्रकार टाळता येऊ शकतात. शेतकऱ्यांनी कीडनाशकांचा वापर योग्य पद्धतीने करावा,’’ असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केला.

ढगे म्हणाले, `` कीडनाशकांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून कारवी. एका विशिष्ट क्षेत्रात एका फवारणीसाठी आवश्यक असतील, तेवढीच कीडनाशके खरेदी करावीत. लेबलांवर बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तपासावी. चांगले सिलबंद कीडनाशकेच खरेदी करा.

साठवणुकीदरम्यान कीडनाशके घरापासून दूर ठेवावीत. कीडनाशके, तणनाशके स्वतंत्रपणे साठवली पाहिजेत. कीडनाशके मुलांपासून दूर ठेवा. घरात कधीही कीडनाशके ठेवू नका. मुलांना व जनावरांना त्या ठिकाणी जाऊ देऊ नका.

कीडनाशकांना थेट सूर्यप्रकाश लागू नये किंवा ती पावसाच्या पाण्यात जाऊ नयेत, यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. वाहतूक करताना कीडनाशके इतर पदार्थांपासून वेगळी ठेवावीत. फवारणीचे द्रावण तयार करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. संपूर्ण शरीर झाकण्यासाठी संरक्षक कपडे वापरावीत. योग्य खबरदारी घ्यावी.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

Agriculture Subsidy : दोन लाख अठरा हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

PM Narendra Modi : शेतकरी सशक्त होऊन देशाच्या प्रगतीचा नायक बनावा : मोदी

Broiler Lifting Rates : ब्रॉयलर पक्ष्याच्या लिफ्टिंग दरात वाढ

SCROLL FOR NEXT