Fertilizers Management : खत व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर भर

Ginger Farming : सातारा जिल्ह्यात ऊस, हळद या नगदी पिकांबरोबर आले पिकाचे क्षेत्रही मोठे आहे. राज्यभर सातारी आले प्रसिद्ध आहे. शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील विनोद बजरंग पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध आले लागवडीमध्ये सातत्य राखले आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Agriculture Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : आले

शेतकरी : विनोद बजरंग पाटील

गाव : शेंद्रे, ता. जि. सातारा

एकूण क्षेत्र : पाच एकर

आले लागवड : पावणेतीन एकर

सातारा जिल्ह्यात ऊस, हळद या नगदी पिकांबरोबर आले पिकाचे क्षेत्रही मोठे आहे. राज्यभर सातारी आले प्रसिद्ध आहे. शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील विनोद बजरंग पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध आले लागवडीमध्ये सातत्य राखले आहे. विनोद यांनी वाणिज्य शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा आपली शेतीचा आवड जपायचे ठरविले.

घरची पाच एकर शेती. त्यात ऊस, ज्वारी, गहू, सोयाबीन या पिकांसह किमान एक एकरात आले लागवड होत असे. मागील सुमारे पंधरा वर्षांपासून विनोद पाटील आले लागवड करत आहे. वेळोवेळी आलेले अनुभव, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी, तांत्रिक लेखांचे वाचन आणि अभ्यास करून आवश्यकतेनुसार व्यवस्थापनात सुधारणा केल्या.

रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याला विशेष प्राधान्य दिले आहे. ऊस, सोयाबीन, हिरवळीची खते यासह जमिनीला विश्रांती, पीक फेरपालट व आंतरपीक म्हणून मिरची लागवड अशा विविध पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी आले पिकामध्ये एकरी उत्पादकता व गुणवत्ता साधली आहे.

Agriculture
Fertilizer Management : माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करा

पीक नियोजन

दरवर्षी बाजारपेठेत आले दरांत चढउतार पाहायला मिळतात. आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी बाजारपेठेतील मागणीचा अंदाज घेऊन आले लागवडीत मिरची पिकाचे आंतरपीक घेण्यावर भर दिला आहे. दरवर्षी मिरची लागवडीतून ते उत्पादन खर्च काढण्याचा प्रयत्न करतात.

आले पिकास जास्त पाणी मानवत नाही. त्यामुळे लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करतात.

मागील सात वर्षांपासून सिंचनासाठी सबसरफेस ठिबक सिंचन प्रणालीच्या वापरावर भर दिला आहे.

दरवर्षी साखर कारखान्यातून प्रेसमड आणून एकरी १५ ते २० टन याप्रमाणे वापर केला जातो. त्यातील ७० टक्के मात्रा नांगरटीनंतर, तर उर्वरित मात्रा बेड तयार केल्यानंतर दिली जाते. याशिवाय कोंबडी खताचा देखील गरजेनुसार वापर केला जातो.

एकदा आले लागवड केलेल्या क्षेत्रात पुढील किमान पाच वर्षे पुन्हा आले लागवड केली जात नाही. लागवडीसाठी नवीन क्षेत्र निवडले जाते. आले काढणीनंतर त्या क्षेत्रामध्ये ऊस लागवड करण्यावर भर दिला जातो.

लागवड नियोजन

दरवर्षी साधारणपणे १५ मे ते १५ जून या दरम्यान आले लागवडीचे नियोजन असते. त्यानुसार २५ मे ला लागवड केली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन लागवडीस प्राधान्य दिले जाते.

या वर्षी स्वतःच्या पाऊण एकर, तर वाट्याने घेतलेल्या दोन एकरांत आले लागवड आहे.

लागवड गादीवाफ्यावर करण्याचे नियोजित असते. त्यानुसार लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने साधारणपणे चार फुटांचे गादीवाफे तयार केले जातात. त्यावर १० बाय १० इंच अंतरावर बेणे लागवड केली जाते.

लागवडीसाठी योग्य गुणधर्म असलेले, निरोगी आणि ४० ते ५० ग्रॅम वजनाच्या कंदाची निवड केली जाते.

लागवडीपूर्वी कंदांना शिफारशीप्रमाणे रासायनिक आणि जैविक प्रक्रिया केली जाते.

चांगली उगवण, कंदकुज व कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक बेणे प्रक्रिया करण्यावर भर दिला जातो.

आले लागवडीवेळी रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात.

Agriculture
Ginger Farming : विक्रमी आले उत्पादनातील अमोल

रासायनिक व्यवस्थापन

बेसल डोसमध्ये निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर केला जातो.

दीड महिन्यानंतर भरणी करून रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यात एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला जातो.

रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आळवणी घेतली आहे.

फुटवे चांगले येण्यासाठी १२ः६१ः० ची आळवणी केली.

आगामी नियोजन

सध्या लागवड होऊन दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.

पावसाळ्यात शेतातील अतिरिक्त पाऊस झाल्यास पाणी बाहेर जाण्यासाठी पाट खोल केले जातात. त्यामुळे शेतात पाणी साचून राहत नाही. शेतात पाणी साचून राहिल्यास कंद कुजण्याची शक्यता असते. त्यासाठी दोन वेळा भर लावण्याची कार्यवाही केली जाईल.

ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा नियमितपणे वापर केला जाईल.

शिफारशीत रासायनिक घटकांची आळवणी, फवारणी यामध्ये सातत्य राखले जाईल. पिकाचे निरीक्षण करून फवारणीचे नियोजन केले जाईल.

जास्त पावसामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. दर्जेदार उत्पादनासाठी कीड-रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर दिला जाईल.

बेणे निवड

लागवडीसाठी निरोगी, सुदृढ बेण्याची निवड करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळेल.

दर दोन ते तीन वर्षांनी बेणे बदलावर भर दिला जातो. लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांकडील बेणे घेणार आहोत, त्यांच्या प्लॉटला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष भेट दिली जाते. त्यावेळी पिकाची पाहणी करून त्यानंतर बेणे खरेदीचा निर्णय घेतला जातो.

लागवडीपूर्वी साधारण दीड महिना म्हणजेच मार्च महिन्यात बेणे खरेदी करून त्याची योग्य पद्धतीने साठवण केली जाते.

विनोद पाटील ९८६०३५६१९० (शब्दांकन ः विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com