Pune News: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या नव्या संचालकाविषयी निविष्ठा उद्योगातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संचालकपदाची मुदत एरवी तीन वर्षांची असते. परंतु मागील काही वर्षांत एकही संचालक मुदत पूर्ण करू शकला नाही. राज्यात निविष्ठा उद्योगाची उलाढाल आता ५० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. .या उद्योगातील गुणनियंत्रण घडामोडींवर निविष्ठासंबंधी कायद्यांद्वारे संचालकाची पकड असते. सध्याचे संचालक अशोक किरनळ्ळी या महिनाअखेरीस निवृत्त होतील. त्यामुळेच नव्या संचालकाच्या नावाची चर्चा निविष्ठा उद्योगात सुरू आहे..सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गुणनियंत्रण संचालकपद कायम वादात राहिले. तत्कालीन संचालक दिलीप झेंडे यांची अचानक बदली केली गेली. त्यानंतर विकास पाटील यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांनाही पूर्ण कालावधी मिळाला नाही. पाटील निवृत्त होताच या पदासाठी अधिकाऱ्यांमधील स्पर्धा टोकाला गेली..Agriculture Department Inquiry: दोन कृषी अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची चौकशी .त्यातून मंत्रालयात या पदाचा घोडेबाजार इतका रंगला, की गुणनियंत्रण संचालकाची खुर्ची दोन आठवडे रिकामी ठेवली गेली. दुसरीकडे कोणीही संचालक झाला तरी खरी चलती किरण जाधव यांची होती. ते साधे तंत्र अधिकारी होते. पुढे ते उपसंचालक झाल्यावरही गुणनियंत्रण विषयक प्रकरणे ते हाताळत होते..दरम्यान, पाटील यांच्या निवृत्तीनंतर गुणनियंत्रण संचालक पदासाठी कायदेशीर पात्रतेचा एकही पात्र अधिकारी कृषी खात्यात मिळत नव्हता. त्यामुळे या पदाची चक्क पात्रताच घटवली. त्यानंतरच्या स्पर्धेत संचालकपद सुनील बोरकर यांच्याकडे गेले. ते सहसंचालक होते. मात्र बोरकरांच्या नियुक्तीमुळे तत्कालीन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते नाराज झाले. त्यांनी बोरकरांच्या अपात्रेताचा मुद्दा न्यायालयात नेला. न्यायालयाने त्यांची निवड अवैध ठरवली. परिणामी, बोरकर यांना गुणनियंत्रण संचालकपद सोडावे लागले होते..Agriculture Department: कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध पुन्हा चर्चेत.बोरकर जाताच गुणनियंत्रण संचालकपदासाठी किरनळ्ळींनी व्यूहरचना केली. त्यात ते यशस्वी ठरले. परंतु कापूस पिशवी खरेदी घोटाळा व प्रयोगशाळा उपकरण खरेदीत किरनळ्ळी वादग्रस्त ठरले. त्यामुळे गुणनियंत्रण संचालकपद पुन्हा चर्चेत आले. किरनळ्ळींचे संचालकपद काढले जाईल, अशी अटकळ होती. .मात्र शासनाने त्यांना निवृत्तीपर्यंत अभय दिल्याचे दिसते आहे. किरनळ्ळींच्या निवृत्तीनंतर या पदासाठी आत्मा विभागाचे संचालक सुनील बोरकर, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी, फलोत्पादन संचालक अंकुष माने यांच्यासह प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे यांचे नाव चर्चेत आहेत..बोरकर यांचे नाव पुन्हा चर्चेतकृषी संचालक माने व नाईकवाडी याच वर्षी निवृत्त होणार आहेत. तर, ‘गुणनियंत्रण’कडे जाण्यास आवटे नाखूश आहेत. त्यामुळे बोरकर यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. बोरकर हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या कृषी सेवा वर्ग एकमधील १९९३ च्या तुकडीचे आहेत. २०१९ ते २२ या कालावधीत ते राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी गुणनियंत्रण संचालकपद हाताळले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.