Elephant Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhugurg Elephant News : हत्तींना जंगलातच रोखण्यासाठी ऊस खाद्याचा वापर

हत्तींना रोखण्यासाठी विविध उपाय निष्क्रिय ठरल्यानंतर आता वन विभागाने हत्ती जंगलातच थांबावे याकरिता जंगलातच ऊसरूपी खाद्य पुरविण्याची योजना आखली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : हत्तींना रोखण्यासाठी विविध उपाय निष्क्रिय ठरल्यानंतर आता वन विभागाने हत्ती जंगलातच थांबावे याकरिता जंगलातच ऊसरूपी खाद्य पुरविण्याची योजना आखली आहे.

केर, मोर्ले परिसरात असलेल्या हत्तींना सध्या प्रतिदिन २५० किलो ऊस खाद्यासाठी घातला जात आहे. त्याचा काही अंशी उपयोग होत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

तिलारी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये हत्तींचा उपद्रव सुरू आहे. ‘हत्ती हटाव’सह विविध उपाय वन विभागामार्फत राबविण्यात आले. परंतु त्याचा तितकासा उपयोग झाला नाही. नुकसानग्रस्तांना मदत देण्याशिवाय कोणताही सक्षम पर्याय राहिलेला नाही.

जिल्ह्यातील केर, मोर्ले (ता. दोडामार्ग) येथे सध्या हत्तींचा मुक्काम असून त्यांच्याकडून शेती, बागायतीचे नुकसान सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत तर हत्ती वस्तीपर्यंत आल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आम्हाला नुकसानीची मदत नको पण हत्तींना रोखा, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून वन विभागाकडे होत होती.

त्याची दखल घेत आता वन विभागाने हत्तींना पुरेसे खाद्य जंगलातच उपलब्ध करून दिले तर ते तेथेच थांबतील या हेतूने केर, मोर्ले भागात असलेल्या हत्तींना खाद्य देण्याची योजना हाती घेतली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून केर, मोर्लेत ज्या भागात हत्तींचा वावर आहे, तेथे वन विभागाच्या क्षेत्रात ऊस खाद्य म्हणून ठेवला जात आहे. प्रतिदिन सुमारे २५० किलो ऊस ठेवला जात आहे.

वन विभागाच्या या उपायानतंर गेल्या तीन दिवसांत हत्ती वस्तीत येऊन शेती नुकसान केल्याचा प्रकार घडलेला नाही.

हत्तींना रोखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जंगलातच हत्तींना खाद्य पुरविण्याचा उपाय आम्ही राबवित आहोत. त्यात यश आल्यास खाद्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तीन दिवसांचा अनुभव सकारात्मक आहे.
ए. आर. कन्नमवर, वनक्षेत्रपाल, सावंतवाडी वनविभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी ६२०० हेक्टर घेणार

Farmers Meeting: केंद्रीय कृषिमंत्री आज साधणार शेतकरी संघटनांशी संवाद

Animal and Fisheries Skill Development: कौशल्यांद्वारे पशुपालन, मत्स्योद्योगाला मिळणार गती

Agriculture Department Incorrect Structure: आस्थापना प्रमुखावर कारवाई करा

India Reservoir Storage: देशातील जलाशयांत पाणीसाठा पोहोचला ७०.३ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT