नेसरी, जि. कोल्हापूर : नेसरी-तळेवाडी परिसरात बुधवारी (ता. १) सकाळी नागरिकांना टस्कर हत्तीचे (Elephant Rampage) दर्शन झाले. हत्तीने ठिकठिकाणी शेती (Agriculturtal) पिकांसह होडी, ट्रॅक्टर, पाण्याची टाकी, विद्युत मोटारींचे (Electric Motar) मोठे नुकसान केले.
हत्ती आल्याचे समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली; मात्र त्यानंतर हत्तीचा ठावठिकाणा लागला नव्हता.
बुधवारी सकाळी नेसरी व तळेवाडी गावच्या हद्दीतील काशीलिंग मंदिर परिसरातील नदी घाटावर बसवलेल्या विद्युत मोटारी, वायरिंग, बॅरेल, नेसरी-डोणेवाडी दरम्यान घटप्रभा नदीवरील होडी, पिकांचे हत्तीने नुकसान केले.
तळेवाडी येथील घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टर, गवत गंजीसह नारळीच्या झाडांचे नुकसान केले. नदीत पडलेल्या मोटारी व बॅरल काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही मोटारी ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल्या.
नागरिकांची हत्ती कुठे गेला व झालेले नुकसान पाहण्यासाठी गर्दी झाली होती. नदीघाट परिसरात हत्तीने केलेल्या नुकसानीची सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी पाहणी करून वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
आजरा वनक्षेत्रपाल स्मिता डांगे, वनपाल प्रकाश वारंग, संजय निळकंठ, वनरक्षक सुनील भंडारे यांनी हत्तीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली.
उपसरपंच प्रथमेश दळवी, डोणेवाडी सरपंच सिकंदर मुल्ला, उपसरपंच रंगराव नाईक, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, अजितसिंह शिंदे, मजीद वाटगी, पोलिस पाटील रमेश नाईक, नावाडी दिनकर फगरे, उदय देसाई, श्रीधर देसाई आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.