Elephant Attack : ओडिशात मागील दहा वर्षांत हत्तींच्या हल्ल्यात ९२५ जणांचा मृत्यू

ओडिशामध्ये मागील दहा वर्षांत हत्तींच्या हल्यामध्ये किमान ९२५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ओडिशाचे वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रदीप अमत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
Elephant Rampage
Elephant RampageAgrowon

Wild Animal Attack भुवनेश्‍वर ः ओडिशामध्ये मागील दहा वर्षांत हत्तींच्या हल्यामध्ये (Elephant Attack) किमान ९२५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ओडिशाचे वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रदीप अमत (Pradip Amat) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

मागील दहा वर्षांत हत्तींच्या हल्ल्यात २१२ जणांना अपंगत्व आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील दहा वर्षांत सुमारे ७८४ हत्तींचा देखील मृत्यू झाल्याची माहिती अमत यांनी यावेळी दिली.

Elephant Rampage
Elephant Rampage : हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळणार

भाजपच्या ललितेंदू विद्याधर महापात्रा यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अमत यांनी ही माहिती दिली. दरम्यान, हत्तींच्या वाढत्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

Elephant Rampage
Elephant Rampage : नेसरीत हत्तीकडून शेती पिकांचे नुकसान

आतापर्यंत ३९ हत्तींच्या मृत्यू प्रकरणी ५० जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र याप्रकरणी अद्याप एकही आरोपीवरील आरोप सिद्ध होऊन त्याला शिक्षा झालेली नाही.

हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या

वर्ष - संख्या

२०१२-१३ - ८०

२०१७-१८ - १०५

२०२१-२२ - ११२

----

हत्तींच्या मृत्यूची आकडेवारी

वर्ष - संख्या

२०१२-१३ - ८२

२०१५-१६ - ८६

२०१८-१९ - ९३

२०२१-२२ - ८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com