Copy Free Exam  Agrowon
ॲग्रो विशेष

Copy Free Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी आवश्यक यंत्रणेचा वापर करा

HCS Exam : इयत्ता १२ वीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

Team Agrowon

Solapur News : फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणेचा वापर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सदर बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता १२ वीची १२१ व इयत्ता १० वीची १८४ परीक्षा केंद्रे आहेत. याबाबत माहिती दिली. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात इयत्ता १२ वीसाठी ११ वी व इयत्ता १० वीसाठी १५ परिरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत.

त्यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी ३ फेब्रुवारीरोजी झालेल्या राज्यस्तरीय व्ही.सी.मध्ये १८२ च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करणेसाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा. याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

इयत्ता १२ वीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

१२ वीसाठी ५५ हजार ८७९ व दहावीसाठी ६५ हजार ५८५ इतके विद्यार्थी बसणार आहेत. सदर परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्ती करण्यात आलेले असून, जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी ३४ व दहावीसाठी ४७ संवेदनशील केंद्रे आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी बैठकीमध्ये दिली.

या परिक्षा केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त व बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात १४४ कलम लागू करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलिस आयुक्त शहर व पोलिस अधीक्षक, ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT