Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीकनुकसानीच्या पूर्वसूचनेबाबत तातडीने नोंद करण्याचे आवाहन

Crop Damage Should be Recorded : वादळवारा, गापिटीमुळे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या काही तासात अवेळी पाऊस, वादळ, गारपीट झाली आहे. वादळवारा, गापिटीमुळे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचे नुकसान झाले असल्यास पुढील प्रकारात नोंद करावी. Unseasonal rain (बगर मोसमी पाऊस), Hailstorm (गारपीट), Cyclonic rainfall (चक्रीय पाऊस) यापैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झालेले आहे तेच कारण नमूद करावे.

क्रॉप कंडीशन (Crop Condition) यामध्ये गहू, रब्बी कांदा पिकास उभे पीक (standing Crop) नमूद करावे.

हरभरा पिकासाठी काढणी पश्चात नुकसान व crope condition (cut &spread) असे नमूद करावे. या पद्धतीने उपरोक्त पिकांची नुकसान टक्केवारी व इतर आवश्यक माहिती परिपूर्ण सादर करून पूर्वसूचना द्यावी.

ही पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत देणे आवश्यक आहे. नुकसान पूर्वसूचना HDFC ERGO विमा कंपनीचा क्रमांक १८००२६६०७०० किंवा कंपनीच्या http://hegi.co/wYaLhgAEAAA= या लिंकचा वापर करावा.

किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲप चा वापर करावा. यापैकी कुठल्याही प्रकारे पूर्वसूचना देता न आल्यास तालुका स्तरावरील कृषी विभागास पूर्वसूचना देण्यात यावी, असे आवाहन किरवे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT