Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease: लम्पी त्वचा आजारावर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Cattle Health: सध्या जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Team Agrowon

Buldhana News: सध्या जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लम्पी आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राने पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेवर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

लम्पी त्वचा आजार विषाणूजन्य आहे. आजाराचा संसर्ग चावणारे कीटक तसेच संक्रमित जनावरांच्या संपर्कातून पसरतो. उष्ण आणि दमट हवामानात आजाराचा प्रसार अधिक प्रमाणात होतो. आजारी जनावरांना ताप येतो, दूध उत्पादन कमी होते, डोळ्यांतून पाणी, लसिका ग्रंथीना सूज येते. डोके, मान, पायांवर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात.

फुप्फुसाचा दाह, कासदाह, गर्भपात आणि प्रजनन क्षमतेत घट, पांढऱ्या रक्त पेशींची संख्या कमी होणे, अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात. पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविके, ज्वरनाशक, आणि जीवनसत्त्व देणे आवश्यक आहे, अशी माहिती बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्रकुमार देशमुख यांनी दिली.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने सुचविलेल्या उपाययोजना 

१० खाऊची पाने, १० ग्रॅम मिरी, १० ग्रॅम मीठ याची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडा गूळ मिसळावा. ही पेस्ट जनावरांना पहिल्या दिवशी दर तीन तासाला आणि दुसऱ्या दिवशीपासून दिवसाकाठी तीनवेळा पंधरा दिवस द्यावी.जखमांमध्ये किडे पडत असतील तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून जखमेमध्ये लावावे. किडे असलेल्या जखमांवर सीताफळाची पाने बारीक करून लावावीत.

लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी जनावरे, गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात.
- डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Middle East War: युद्ध नको, बुद्ध हवा

Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजनेत आता वराहपालनचा समावेश

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

SCROLL FOR NEXT