Raigad News : काही दिवसांमध्ये पेण, अलिबाग, उरण व पनवेल या तालुक्यांमध्ये युरिया खताची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते, परंतु, आता जिल्ह्यात नियमितपणे पुरवठा करण्यात येणार आहे, असे कृषी विभाग आणि आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधी यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे विभागामार्फत सांगण्यात येत आहे.
खरीप हंगामासाठी ११ हजार ९३१ मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर असून, आतापर्यंत एकूण नऊ हजार १५० मेट्रिक टन युरिया व बफर स्टॉकमधील ६९८ मेट्रिक टन असा एकूण नऊ हजार ८४८ मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा जिल्ह्यात झाला आहे.
त्यापैकी १ ते ७ ऑगस्ट या सात दिवसांच्या कालावधीत ७९० मेट्रिक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात आरसीएफ कंपनीकडून करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
अधिकृत केंद्रातून खत खरेदी करावी
शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत कृषी केंद्रधारकांकडूनच खत खरेदी करावे व सरकारने निश्चित केलेल्या दरानेच खरेदी करावे व घेतलेल्या खताची पावती संबंधित कृषी केंद्रधारकांकडून घ्यावी. काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा व तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
शासकीय कृषी केंद्रधारकांसाठी सूचना
विक्री केंद्रावर सर्व उत्पादने व त्यांची अधिकृत किमती स्पष्टपणे फलकावर दर्शवाव्यात. शेतकऱ्यांना पक्के बिल देणे अनिवार्य आहे. दररोजचा खरेदी-विक्री साठा नोंदवहीत नियमित लिहावा. फक्त अधिकृत कंपन्यांचे, सरकारमान्य उत्पादनेच विक्रीसाठी ठेवावीत. बोगस किंवा कालबाह्य उत्पादने विक्रीस ठेवू नयेत. खताची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.