Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Green Ammonia : देशात २०२४-२५ मध्ये सुमारे ३८.८ दशलक्ष टन युरियाची विक्री झाली. तसेच भारत सुमारे २२ दशलक्ष टन नैसर्गिक वायूची आयात करत असून, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे.
Urea Shortage
Urea ShortageAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशात युरिया खताची टंचाई निर्माण होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी एसीएमई समूहातील एका गटाने ‘अनहायड्रस आणि ॲक्वस अमोनिया’ म्हणजेच ‘ग्रीन अमोनिया’च्या पथदर्शक प्रकल्पासाठी (पायलट प्रोजेक्ट) भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) परवानगी मागितली आहे. त्यामुळे भारतात या ग्रीन अमोनिया खत वापरासाठी मान्यता मिळू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

ग्रीन अमोनिया खत प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे, असे आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी सांगितले. या प्रकल्पासाठीच्या खर्चाची जबाबदारी एसीएमई असून आयसीएआर त्यासाठी प्राथमिक परीक्षण, पीक संशोधन आणि शेतकऱ्यांच्या सहभागासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयसीएआरने ग्रीन अमोनियाच्या वापरासाठी मान्यता दिली, तर केंद्र सरकार खत नियंत्रण आदेशात आवश्यक बदल करून शेतकऱ्यांना ग्रीन अमोनिया खत म्हणून उपलब्ध करून देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Urea Shortage
Urea Shortage : सांगलीत युरियाची टंचाई

देशात २०२४-२५ मध्ये सुमारे ३८.८ दशलक्ष टन युरियाची विक्री झाली. तसेच भारत सुमारे २२ दशलक्ष टन नैसर्गिक वायूची आयात करत असून, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जात आहे. भारताने मागील वर्षी ५.६५ दशलक्ष टन युरियाची आणि ४ दशलक्ष टन अमोनियाची आयात केली.

त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रीन अमोनियाला मान्यता दिल्यास खतांचा वापर कमी होईल. तसेच ग्रीन अमोनिया नत्राची कार्यक्षमता वाढून मातीतील सूक्ष्मजीव विविधता आणि उत्पादनक्षमता टिकून ठेवेल, असा दावाही एसीएमईकडून केला जात आहे.

Urea Shortage
Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

ग्रीन अमोनिया काय?

ग्रीन अमोनिया पर्यावरणपूरक खत असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये पारंपरिक युरिया खताच्या तुलनेत अधिक कार्यक्षमता असल्याचा दावा केला जात आहे. सध्या युरियामधून केवळ ४६ टक्के नत्र पिकांना मिळते. परंतु ॲक्वस अमोनियामध्ये ६० ते ६५ टक्के आणि अनहायड्रस अमोनियामध्ये ८२ टक्के नत्राचे प्रमाण असल्याचे सांगण्यात आले.

अनहायड्रस अमोनिया उत्तर अमेरिका, ब्राझील आणि चीनमध्ये गहू, भात, मका, ऊस आणि बागायती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. भारतात मात्र आयसीएआरला प्रत्येक पिकासाठी योग्य अमोनिया डोस ठरवावा लागेल. तसेच त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी प्रशिक्षण, सुरक्षित हाताळणी याबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

आम्ही आयसीएआरकडून चाचणी अंमलबजावणीसाठी तांत्रिक नेतृत्व, वैज्ञानिक निरीक्षण, पीक संशोधन आणि शेतकरी सहभागाची अपेक्षा करत आहोत, तर एसीएमई कंपनी ग्रीन अमोनिया आणि तांत्रिक सहाय्य पुरवेल. या प्रकल्पासाठी १३ हजार ते १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, या प्रकल्पाची क्षमता दरदिवशी १ हजार २०० टन इतकी असेल. सरकारने मान्यता दिली तर पुढील रब्बी हंगामापासून चाचण्या सुरू करण्यात येतील. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी ३ वर्षे लागतील.
- शशी शेखर, उपाध्यक्ष, एसीएमई क्लीन टेक सोल्यूशन्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com