Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत खत पुरवठ्यात हात आखडता

Fertilizer Demand : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत २०२५ च्या खरीप हंगामासाठी युरिया खताची ३ लाख ७ हजार ४६१ टनांची मागणी करण्यात आली होती.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत मंजूर पुरवठा व रॅक प्लॅननुसार पुरवठा करण्यात रासायनिक खतपुरवठा करण्यात कंपन्या कमी पडल्याने युरियासह डीएपी खताचा प्रामुख्याने तुटवडा झाला असल्याची बाब पुढे आली आहे.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत २०२५ च्या खरीप हंगामासाठी युरिया खताची ३ लाख ७ हजार ४६१ टनांची मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या तुलनेत कृषी आयुक्तालयातून विभागासाठी २ लाख ४० हजार १७२ टन युरियाचा पुरवठा मंजूर करण्यात आला. मंजूर पुरवठ्यापैकी जूनअखेर १ लाख ५ हजार ६७६ टन युरियाचा पुरवठा अपेक्षित आहे.

प्रत्यक्षात ५ जून अखेरपर्यंत ५८,५४५ टन युरिया खताचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे युरियाची कमतरता जाणवते आहे. याशिवाय डीएपीची मागणी १ लाख १५ हजार ९९२ टन करण्यात आली. त्या तुलनेत कृषी आयुक्तालयाकडून ७३ हजार ५९९ टन पुरवठा मंजूर करण्यात आला. मंजूर पुरवठ्याच्या तुलनेत जूनअखेर ३६ हजार ८०० टन डीएपीचा पुरवठा करणे अपेक्षित असताना खत कंपन्यांनी केवळ १४,८५५ टन डीएपीचा पुरवठा ५ जूनअखेरपर्यंत केला होता.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६,०५६ टन जालन्यातील ३,४०२ टन तर बीडमधील ५,३९७ टन डीएपी खताच्या समावेश होता. त्यामुळे डीएपीची कमतरता आहे. खत पुरवठादार कंपनी आरसीएफचा प्लॅट मे मध्ये बंद होता. शिवाय युरिया आयात बंदचा परिणामही युरिया उपलब्धतेवर झाला.

युरियाच्या तुटवड्यासंदर्भात काही कंपन्यांना प्रशासनाकडून ईसीअंतर्गत नोटीसही बजावण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रॅक पॉइंट बंद असल्याचा परिणामही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागांत खतांचा तुटवडा जाणविण्यावर झाला. यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आल्याची माहिती कृषीच्या सूत्रांनी दिली.

नऊ ते दहा हजार टन युरिया उपलब्ध होण्याची आशा

कृषी विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जूनमध्ये ४९ हजार ५०९ टन युरियाचा पुरवठा मंजूर होता. मंजूर पुरवठ्यानुसार १५ दिवसांच्या अंतराने खतपुरवठा कंपन्यांकडून रॅक प्लॅन दिला जातो. प्रत्यक्षात रॅक प्लॅन मंजूर पुरवठ्यानुसार देणे आवश्यक असताना कंपन्यांकडून ३६,२९१ टन युरिया खत पुरवठ्याचा प्लॅन देण्यात आला. खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २३) खत उपलब्धता आढावा बैठक झाली.

यामध्ये आरसीएफने एप्रिल व मेमध्ये पाचपैकी एकही रॅक लावली नाही. कृभको व चंबल फर्टिलायझर्सकडून जूनमध्ये आतापर्यंत रॅक प्राप्त झाली नसल्याची माहिती आहे. याशिवाय स्पिक कंपनीकडूनही रॅकनिहाय प्लॅन नियोजनानुसार अपेक्षित पुरवठा झालेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. आता लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासन व कृषी विभागाकडून खत उपलब्धतेसाठी पाठपुरावा सुरू असून येत्या महिन्यात नऊ ते दहा हजार टन युरिया उपलब्ध होण्याची आशा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरवठ्यातील कमतरतेमुळे युरिया व डीएपीचा तुटवडा जाणवतो आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या माध्यमातून खताच्या उपलब्धतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी गरजेनुसार खत खरेदी करावे सोबतच, नॅनो युरियाचा वापर करावा.
- प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जि. प., छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा

Banana Export: माळशिरसमधून दररोज १० टन केळीची निर्यात

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

SCROLL FOR NEXT