Fertilizer
FertilizerAgrowon

Fertilizer Supply : जूनअखेर मंजूर आवंटनापेक्षा कमी खतांचा पुरवठा

Fertilizer Stock : खरीप हंगाम २०२५ साठी हिंगोली जिल्ह्याला जूनअखेर विविध ग्रेडचा ३९ हजार ४३३ टन खतसाठा मंजूर आहे.
Published on

Hingoli News : खरीप हंगाम २०२५ साठी हिंगोली जिल्ह्याला जूनअखेर विविध ग्रेडचा ३९ हजार ४३३ टन खतसाठा मंजूर आहे. परंतु सोमवारपर्यंत (ता. १६) सर्व ग्रेडचा मिळून एकूण २६ हजार ९०४ टन खतांचा पुरवठा झाला. पोटॅश वगळता इतर ग्रेडच्या खतांचा आवटंनापेक्षा कमी पुरवठा झाला.

शेतकऱ्यांची मागणी वाढली. त्यामुळे बफर स्टॉकमधून १०० टन डीएपी खुले करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर ८१ हजार ५६९ टन आहे. त्यानुसार ८ खरीप हंगाम २०२५ साठी (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) विविध ग्रेडच्या ८२ हजार ३६३ टन खतांची मागणी केली होती.

Fertilizer
Fertilizer Relief: बफर स्टॉकमधून युरिया, डीएपीचा १ हजार ६६८ टन साठा खुला

परंतु कृषी आयुक्तालयाने ८९ हजार ६६९ टन रासायनिक खते मंजूर केली. मागणीच्या तुलनेत ७ हजार ३०६ टन जास्त तर खरीप २०२४ मधील ८५ हजार ४५१ टन खतांच्या तुलनेत ४ हजार २१८ टन एवढी जास्त खते मंजूर आहेत.

त्यात युरिया १९ हजार ८८५ टन, सुपर फॉस्फेट १७ हजार १०० टन, पोटॅश- एमओपी २ हजार ७२० टन, डीएपी १२ हजार ९६४ टन, संयुक्त खते -एनपीके ३७ हजार टन या खतांचा समावेश आहे. जूनअखेरपर्यंत ३९ हजार ४३३ टन खते मंजूर आहेत.

Fertilizer
Illegal Fertilizer Stock : अवैध खतसाठाप्रकरणी पाथरी पोलिसांत गुन्हा

१ एप्रिलपासून आजवर २६ हजार ९०४ टन खतांचा पुरवठा झाला आहे. ३१ मार्च २०२५ अखेर विविध ग्रेडची १८ हजार ३९ टन खते शिल्लक होती. यंदा खरिपासाठी झालेला पुरवठा मिळून एकूण ४४ हजार ९४४ टन खते उपलब्ध होती. त्यापैकी विविध ग्रेडची मिळून २९ हजार २२ टन खतांची विक्री झाली.

बफर स्टॉकमधून १०० टन डीएपी खुले

२०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळामार्फत युरिया १०० टन आणि राज्य पणन महासंघामार्फत युरिया १ हजार ३०० टन आमि डीएपी ८०० टन असा एकूण २ हजार २०० टन खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्याचे उद्दिष्ट आहे. डीएपी ३०० टन व युरिया ७९.९२ टन साठा संरक्षित करण्यात आला. त्यातून १०० टन डीएपी खुले करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com