
Ahilyanagar News : शासनाने खताची लिंकिंग बद करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून खत कंपन्यांकडून युरिया, डीएपी खताचा पुरवठाच केला नाही.
त्यामुळे खरिपाच्या तोंडावर खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. शासनाने तातडीने अहिल्यानगर जिल्ह्यात खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी aशेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे, पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अनिल औताडे म्हणाले, की खतासोबत अन्य खताची लिंकिंग केली जात असल्याबाबतची ओरड झाल्यानंतर सरकारी पातळीवरच लिंकिंगबाबत कठोर भूमिका घेतली. ही बाब चांगली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खतांचा खत कंपन्यांनी पुरवठा केला नाही. युरिया नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यासह व्यापारी खताचा रॅक लागण्याची प्रचंड वाट बघत आहे.
युरिया उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांची इतर खते विक्री थांबली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याबाबत कृषी विभागाला विचारले असता लिंकिंग (पुरवणी खते) शासनाने व व्यापाऱ्यांनी बंद केल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली जात असल्याचे औताडे यांनी सांगितले आहे. युरिया व डीएपी पुरवठा हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे.
एकट्या श्रीरामपूर तालुक्यात जवळपास ५०० टन बफर स्टॉक युरियाचा आहे. डीएपी व युरिया यांसारख्या खतांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध असताना खत कंपन्यांकडून पुरवठा करण्यास असमर्थता का दर्शविली जाते याबाबत कृषी विभागाने खुलासा करावा, अशी मागणी अनिल औताडे यांच्यासह श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, हरिभाऊ तूवर, संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, जिल्हा युवा आघाडीचे बच्चू मोडवे, अशोक काळे, नरेंद्र काळे, डॉ. दादासाहेब अधिक, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. विकास नवले, ऍड प्रशांत कापसे, अँड सर्जेराव घोडे, डॉक्टर रोहित कुलकर्णी, सतीश नाईक, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, सुजित बोडखे, शरद असणे, ईश्वर दरंदले, अमोल मोढे , इंद्रभान चोरमळ, कडू पवार, अहमद भाई इनामदार, अकबर शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.