Soybean and Urad Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : बारामती बाजार समितीत उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Baramati APMC : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘नाफेड’मार्फत मूग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे.

Team Agrowon

Pune News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘नाफेड’मार्फत मूग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. त्याकरिता शेतकरी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी दिली.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमीदर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव ९ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार येथील केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीन प्रतिक्विंटल रुपये ४,८९२ व उडीद रुपये ७,४०० आणि मूग रुपये ८,६८२ प्रतिक्विंटल या हमीदराने शासन खरेदी करणार आहे.

सध्या मूग, उडीद व सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला आहे. बाजार आवारात नवीन शेतीमालाची आवक सुरू झाली आहे. बाजार आवारात मागणी व पुरवठा यानुसार दर निघतात. वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाचा माल हमीदराने विक्रीची सोय करावी म्हणून बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. हे केंद्र सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती बाजार समितीकडून करण्यात येत आहे.

या केंद्रावर शेतकऱ्यांनी नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी जो शेतीमाल विक्री करावयचा आहे, त्याची नोंद असलेला २०२४-२५ वर्षाच्या पीकपेऱ्यासहीत सात-बारा उतारा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

शासनाने दिलेल्या कालावधीनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी बारामतीतील तीन हत्ती चौकातील बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ येथे नाव नोंदणी करावयाची आहे. बारामती मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाइन नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल १५ ऑक्टोबरपासून समितीचे यांत्रिक चाळणी येथे खरेदीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाच्या निकषाप्रमाणे एफ. ए. क्यू दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT